मग ६० वर्षावरील राज्यकर्त्यांनी सुद्धा राजीनामे द्यावे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगला सुरवात झाली खरी मात्र कोरोना संसर्गाचा धोका लहान मुले आणि ६० वर्षावरील व्यक्तींना जास्त असल्याच्या कारणामुळे जेष्ठ कलाकारांना शूटिंगला जाण्याला राज्य सरकारने मज्जाव केला होता.

राज्य सरकारच्या निर्णयाला आता अभिनेते विक्रम गोखले यांनी सरकारच्या विरोधात उघडपणे भूमिका मांडली आहे. जर कलाकारांसाठी असा कायदा असेल तर मग ६० वर्षांवरील नेत्यांनी आपले राजीनामे द्यावेत. त्यांनी आधी निवृत्त व्हावे, असे विक्रम गोखले यांनी म्हटले आहे.

राज्यात कोरोनाच्या संकटामुळे मागील चार महिण्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊन मध्ये काही नियमांमध्ये शिथिलता आणत पुन्हा एकदा महाराष्ट्राला पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सरकारने सुरु केला आहे.

त्यात काही अति शर्तींच्या अधीन राहून पुन्हा एकदा शुटिंगला सुरवात करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. मात्र ६० वर्षावरील कलाकारांना शूटिंगला जाण्यासाठी शासनाने मज्जाव केला होता. त्याविरोधात आता चित्रपट सृष्टीतून नाराजीचे सूर उमटत आहे.