आठवणीतले आण्णा…..!
“लोकनेते बाबुराव आण्णांचे लहानपणापासूनच शेतीशी आणि मातीशी नातं घट्ट होते, अतिशय खडतर आयुष्य जगताना सुद्दा कधीच परिस्थितीचे तुनतुने वाजवले नाही.उलट प्रत्येक संकटाला वाघासारखे सामोरे जाऊन बाणेदार व झुंजार वृत्तीचा आदर्श समाजाला घालून दिला., इंग्रज सरकारच्या मुसक्या आवळणारे आण्णा सर्वसामान्य जनतेशी असणारी नाळ कधीच तुटू देत नव्हते. समाजरूऋणातून उतराई होण्यासाठी आण्णांनी तालुक्यामध्ये सहकाराचे जाळे निर्माण केले .

आज राजकारण घाणेरड्या पद्धतीने खेळलं जात आहे,नेत्यांचे पिक प्रचंड प्रमाणात वाढलय.,जाती धर्माच्या नावाखाली कुणीही पुढारी बनल्याने आरोप-प्रत्यारोपाचा धुराळा उडवून चिखलफेक केली जाते, त्यामुळे सुसंस्कृत समाज आणि राजकारणाला हादरे बसत आहेत.,आण्णांनी संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी वेचले.
धडपड्या वृत्तीचे, दुरदृष्टीचे व्यक्तीमत्व,स्वच्छ व निष्कलंक राजकारणी म्हणून छाप असणार्या आण्णांवर एकाही राजकीय नेत्यांनी जाहीर सभेमध्ये कधीच टिका केली नाही, हीच आण्णांच्या स्वच्छ राजकारणाची पावती आहे.’माणूस आयुष्यात प्रचंड पैसा,धन, प्रसिद्धी मिळवतो, परंतु गरिबांचे मन आणि मानवता जपणारे नेते सद्या दुर्मिळ होत चालले असताना सर्वसामान्य जनतेला “लोकनेते, आण्णांची आठवण आल्याशिवाय रहात नाही
.

मोहोळ तालुक्यातील राजकीय विरोधक सुद्दा आण्णांचे नाव घेतल्याशिवाय सभेला सुरूवात करत नाहीत., हेच आण्णांचे मोठेपण. सर्वसामान्य जनते विषयी आण्णांची तळमळ.” सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी लढा देणार्या आण्णांच्या भोवती सदैव कार्यकर्त्यांचा घोळका असायचा., तोच वारसा आज मा.राजनजी मालकांनी जोपासला आहे. कार्यकर्त्यांच्या अगोदर ग्रामपंचायत मध्ये खुर्ची टाकून मालक बसलेले असतात.सर्वसामांन्याना गावातील सरपंचाची वाट पहावी लागते परंतु मालकच जनतेची, कार्यकर्त्यांच्यी वाट पहात असतात हीच आण्णांच्या शिकवणीची शिदोरी..
लहानपणापासुनच आणांना कुस्तीची आवड होती, कुस्तीचे प्रेम त्यांनी आयुष्यभर जोपासलं. दारू व गुटखा खाऊन तरूणांनी आरोग्य बरबाद करू नये म्हणून अनेक गोरगरीबांच्या पोरांना स्वखर्चाने दुध पाजले,खुराक देऊन अनगरमध्ये पैलवान तयार केले.त्यामुळे अनगरचा आखाडा राज्यभर गाजला.अनेक मातब्बर मल्लांनी या आखाड्यात हजेरी लावली., पक्षाचे लेबल न लावता कर्तृत्वाचे लेबल लावून जनसामान्यांची सेवा करुन चंदनासारखे आयुष्य जगणाऱ्या आण्णांची आठवण अनगर पंचक्रोशीतील माणसांना आजही क्षणोक्षणी येत आहे.


सहकार क्षेत्राची मान आणि शान उंचावून सहकार क्षेत्राला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचे ऐतिहासिक काम आण्णांनी केले.आण्णांच्याच पावलावर पाऊल ठेवून कर्तव्याचा ठसा उमटविणारे आण्णांचे सुपुत्र माजी आमदार राजनजी पाटील साहेबांना सडेतोड व स्पष्ट वक्ते म्हणून राष्ट्रवादी पक्षांमध्ये मानाचे स्थान आहे.
आण्णांचे नातू बाळराजे पाटील व अजिंक्यराणा पाटील यांनी सुद्धा आण्णांच्या विचारावर पाऊल ठेवून कर्तव्याचा राजकीय प्रवास चालू ठेवला आहे.राजकीय शत्रूंनी राजन मालकांच्या विरोधात प्रचंड मोठी षडयंत्रे रचली परंतु आण्णांच्या शिकवणरुपी शिदोरीमुळे पाटील कुटुंबीयांनी अनेक वादळांना यशस्वीपणे तोंड दिले.अनेक सुनामी लाटा अनगर पर्यंत सूद्दा पोचल्या नाहीत.’कोणता चेंडू कसा खेळून काढायचा, उत्तुंग षटकार कधी खेळायचा हे राजन मालक यांच्या कडून शिकण्यासारखे आहे.

आण्णांच्या मनाच्या मोठेपणामुळे छोट्या छोट्या माणसांना सुद्दा आपोआपच मोठेपण लाभायचे, आण्णांचे समाजामध्ये वाड्या-वस्त्यावर जिथं दिवा सुद्दा पेटायचा नाही तिथं पर्यंत संपर्क होता.आण्णा समाजमनावर राज्य करायचे, स्वताचे मोठेपण बाजूला ठेवून सर्वांच्या सुख दुःखात मिसळायचे, त्यामुळे सामान्य जनता आण्णावर जिव ओवाळून टाकायला आर्ध्या रात्री सुद्दा तयार असायची.
‘सत्याचा पुरस्कार करणारे, ‘अन्यायाला फोडून काढणारे, ‘गोरगरीबांना आधार देणारे,’दिन-दुबळ्यांच्या जिवनात नंदनवन फुलवणारे, ‘शेतकर्यांचे कैवारी, ‘अशा सर्व गुण संपन्न थोर ‘मोहोळ तालुक्याचे पहिले (१९५२) आमदार धाडसी व्यक्तिमत्त्व आदरणीय लोकनेते बाबुराव आण्णा पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन…!!

अभिवादक- बापूसाहेब घळके ( बिटले )
१ आॅगस्ट या १०३ व्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.!!