बार्शी : मोटारसायकलस्वाराला पिकअपने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. बार्शी शहरातील मल्लिकार्जुन मंदीरासमोर ९ एप्रिल रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता सदरची घटना घडली.

शेख अझीजुल शेख निझामुद्दीन हक रा. कुलबारूई गोपीकांतपूर पो.जोलकुल जि हुगळी पं.बंगाल असे यातील मयताचे नांव आहे. असिफुर रहमान प.बंगाल सध्या रा.चोरमुले प्लॉट, बार्शी याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
याबाबत मोटारसायकलस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पिकअपचालकावर बार्शी शहर पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे. शेरखान नवाब पठाण रा. उपळाई रोड, बार्शी असे यातील आरोपींचे नांव आहे.
शेख अझीजुल हक हा त्याच्या मोटारसायकल (क्र. एम-एम-१३-एव्ही-८४०३) वरून जात असताना, त्याचवेळी (क्र. एमएच-१४-जेएल-७४००) हा पिकअप भरधांव वेगात मल्लिकार्जुन मंदीराजवळून जात होता. त्याचवेळी पिकअपने मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली.
यावेळी मोटारसायकलवरील एकाने उडी मारल्याने तो बचावला तर शेख अझीजुल हा खाली पडला. त्याच्या अंगावरून पिकअप गेली. त्यात तो गंभीर जखमी होवून जागीच ठार झाला. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने वाहन चालवून शेख अझीजुल याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पिकअप चालक शेरखान नवाब पठाण याच्यावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.