बाजार समितीने जगदाळे मामा हॉस्पिटलला दिली आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी देणगी
संस्थेने सर्व देणगीदारांचा केला सत्कार, संस्थेच्या
इतिहासातील सर्वात मोठी देगणी

बार्शी: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने संचालक मंडळाच्या वतीने जगदाळे मामा हॉस्पिटलच्या ट्रॉमा युनिट व आयसीयू युनिटसाठी पंचेविस लाख रुपये देणगी देण्याचा सहकार विभागाकडे मंजूरीसाठी पाठवलेला प्रस्ताव शासनाने मंजूर केल्यानंतर बाजार समितीच्या वतीने पंचेविस लाख रुपयाचा धनादेश श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाकडे सुपूुर्द केला.
या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक व साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनिस, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत ,आ.राजेंद्र राऊत, यशोदा शिक्षण संस्थेचे अरुण बारबोले, संस्थेचे
अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी,शिवशक्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश बुरगुटे, संस्थेचे सचिव व्ही.एस.पाटील, सहसचिव पी.टी. पाटील, खजिनदार दिलीप रेवडकर, सांस्कतिक विभाग प्रमुख जयकुमार शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बाजार समितीने पंचेविस लाख, लक्ष्मीसोपान बाजार समिती(आ.राजेंद्र राऊत ) पाच लाख , रावसाहेब मनगिरे एक लाख , ज्येष्ठ व्यापारी दिलीप गांधी पाच लाख, दि.बार्शी मर्चट असो. दहा लाख, ज्येष्ठ व्यापारी मैनुद्दीन तांबोळी अडीच लाख, जितेंद्र माढेकर एक लाख, सचिन मडके व सौदागर नवगिरे प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपये , संस्थेचे लाईफ वर्कर शिवाजी शेळवणे एक लाख आदी धनादेश डॉ. यादव यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.

श्रीपाल सबनिस म्हणाले की अशा प्रमारे सुमारे पन्नास कोटी रुपये खर्च करुन तयार होत असलेले तालुका स्तरावरील राज्यातील पहिले ट्रॉमा युनिट आहे़ डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी दाखवून दिलेल्या वाटेवरुन संस्थेच्या संचालक मंडळाची वाटचाल सुरु आहे.बार्शीकरांनी दिलेले दान सत्पात्री दान असून त्याचा बार्शीकरांना निश्चीतच उपयोग होईल.

आ. राऊत म्हणाले की बार्शीची जी भरभराट किंवा प्रगती झालेली दिसत आहे. त्यामध्ये क्रमांक एकचा वाटा आहे़ श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा तर त्यानंतर शहरातील वैद्यकीय क्षेत्र,बाजार समिती व शहरातील व्यापारी यांचा आहे. या सर्वांमुळे हे वैभव टिकून
आहे़ पंतप्रधान केअर फंडातून या ट्रॉमा केअर सेटरसाठी मदत मिळावी यासाठी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मदतीचा प्रस्ताव सादर करणार असल्याचे सांगीतले. जगदाळे माम हॉस्पिटल म्हणजे
केवळ बार्शीच नव्हे तर आसपासच्या उस्मानाबाद, बीड व अहमदनगर जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील रुग्णांचा आधार आहे. बाजार समितीच्या
सर्वपक्षीय संचालक मंडळाने एकमताने हा निधी देण्याचा ठरावमंजूर केल्याबद्दल त्यांनी आभार मानले .
डॉ. बी.वाय. यादव यांनी देणगीदारांचे आभार मानत संस्थेच्या आजवरच्या ८६ वर्षाच्या इतिहासातील एका संस्थेने दिलेली ही सर्वात मोठी देगणी असल्याचे सांगीतले. यावेळी मर्चंट असो.चे सर्व पदाधिकारी, बाजार समितीचे सर्व संचालक व वैयक्तीक देणगीदार यांचा सन्माचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन किरण गाढवे यांनी केले तर आभार रणीवर राऊत यांनी मानले.