आजवरचा सर्वात मोठा आकडा: सोलापूर शहरात 153 तर ग्रामीण भागात 59 असे 212 रुग्ण वाढले; शहरात चार मृत्यू

0
410

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना दाखल झाल्यापासून एकाच दिवशी सर्वाधिक रुग्णांची भर आज पडली आहे. ग्रामीणमधील 59 तर महापालिका हद्दीतील 153 जण अशी एकूण 212 रुग्णांची भर आज पडली आहे. कोरोना चाचणीचे 292 अहवाल अद्यापही प्रलंबित आहे. महापालिका हद्दीतील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. महापालिका हद्दीतील 68 आणि जिल्हा परिषद हद्दीतील 39 असे एकूण 107 जण आज कोरोना मुक्त झाले आहेत.

जिल्हा परिषद हद्दीतील एकाही व्यक्तीचा आज मृत्यू झाला नाही. सोलापुरातील विजापूर रोडवरील कमला नगर परिसरातील 64 वर्षिय पुरुष, साखरपेठ कन्ना चौक परिसरातील 75 वर्षिय पुरुष, काडादी चाळ रेल्वे लाइन्स परिसरातील 75 वर्षीय महिला, उत्तर कसबा परिसरातील 58 वर्षिय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापुरातील रेल्वे लाइन्स, संतोष नगर बाळे, यतिमखाना विजापूर रोड, शोभा देवीनगर, रेसिडेन्स क्वॉर्टर, गुरुदेव दत्त नगर जुळे सोलापूर, भवानी पेठ, एसएम रेसिडेन्सी शेळगी, गणेशनगर मडके वस्ती, शासकीय निवासस्थान, मल्लिकार्जुननगर हत्तुरे वस्ती, मारुती मंदिर जवळ मजरेवाडी, आसरा सोसायटी होटगी रोड, बजरांगनगर होटगी रोड, कुमठे गाव, भाग्यलक्ष्मी पार्क जुळे सोलापूर, कल्याण नगर जुळे सोलापूर, ओम नमः शिवाय नगर हत्तुरे वस्ती, स्वामी विवेकानंदनगर हत्तुरे वस्ती,

सैफुल, लक्ष्मीनगर हत्तुरे वस्ती, ताकमोगे वस्ती मजरेवाडी, काडादी नगर हिप्परगा रोड, पश्‍चिम मंगळवार पेठ, कमटम वसाहत गीतानगर, आदर्श नगर कुंभारी नाका, देशमुख पाटील वस्ती, जोडभावी पेठ, एमआयडीसी अक्कलकोट रोड, नवजीवन नगर, गायत्री नगर, दाराशा क्वॉर्टर, किल्लेदार नगर होटगी रोड, भवानी पेठ मड्डी वस्ती, जोशी गल्ली शेळगी, बुधवार पेठ, सोमवार पेठ, मल्लिकार्जुन नगर कुमठा नाका, कमल नगर विजापूर रोड, हुच्चेश्‍वरनगर कुमठा नाका,

मुरारजी पेठ, उत्तर सदर बझार, कोणार्क नगर जुळे सोलापूर, कर्णिक नगर, गणेश बिल्डर, बेघर वसाहत मजरेवाडी, विडी घरकुल, खडक गल्ली बाळे, अवंती नगर, गोकुळ नगर सैफुल, नंदीनाथ नगर, टिकेकरवाडी, भाग्यश्री पार्क होटगी रोड, करळेनगर देगाव, शास्त्रीनगर शानदार चौक, टिळक चौक, मोहिते नगर होटगी रोड, आशियानानगर जुळे सोलापूर, स्वागत नगर कुमठा नाका, विद्याविहार सोसायटी, हत्तुरे वस्ती, मंत्री चांडक विहार होटगी रोड, शिवाजीनगर,

थोबडे नगर, दमाणी नगर, अंत्रोळीकर नगर, मित्र नगर शेळगी, होमकर नगर भवानी पेठ, सोनी नगर विजापूर रोड, साहिल नगर होटगी रोड, नवोदय नगर होटगी रोड, देगाव, संतोष नगर बाळे, गणेश बिल्डिंग रुषी नगर, राजेंद्र चौक या भागात आज नवे रुग्ण आढळले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज गुरुवारी ग्रामीण भागातील ५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये ३५ पुरुष तर २४ महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या ३९ आहे.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या ११७२ इतकी झाली आहे. यामध्ये ७३४ पुरुष तर ४३८ महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर, आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४१ जणांचा मृत्यू झाला आहे यात ३१ पुरुष तर १० महिलांचा समावेश होतो.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या ६७२ आहे .यामध्ये ४१५ पुरुष २५७ महिलांचा समावेश होतो आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या ४५९ यामध्ये २८९ पुरुष तर १७० महिलांचा समावेश होतो.अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी बी. टी. जमादार यांनी दिली आहे

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here