बार्शी – तालुक्यातील दहिटणे गावामध्ये घरासमोरील अंगणामध्ये ठेवलेले ४० कट्टे सोयाबीन चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. नितीन दासु लोखंडे (वय ३८) वर्षे, धंदा- शेती रा. जाधव वस्ती, दहिटने ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैराग पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दहिटणे गावामध्ये शेतात सोयाबिन ची रास करुन सोयाबीन वाळवुन सोयाबीन पोत्यात भरुन शेतातील वस्तीवरील घरासमोर अंगनात ठेवले आहे. २६ ऑक्टोबर रोजी दिवसभर सोयाबीन ओलसर असल्याने वाळवुन सायंकाळी पोत्यात भरुन माझे वस्तीवरीस घरासमोरील अंगणात एकुन सोयाबीनचे १४ कट्टे रचुन ठेवले होते. त्यानंतर आम्ही घरातील सर्वजन रात्री ९.३० वा. चे सुमारास जेवनखान करुन घरात झोपलो होतो. त्यानंतर दि. २७ ऑक्टोबर रोजी ००.१५ वा. चे सुमारास मोटारसायकल चा आवाज आल्याने घरातील सर्वजन जागे झालो व दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता दरवाज्याला बाहेरुन कडी लावली असल्यामुळे दरवाजा उघडत नव्हता. फिर्यादीच्या मुलास दुसऱ्या दरवाज्याने बाहेर पाठवुन कडी उघडली त्यावेळी आम्ही बाहेर येवुन माझ्या अंगणात ठेवलेले सोयाबीनचे १४ कट्यापैकी २ कट्टे दिसुन आले नाहीत त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे-

1) सोयाबीनचे ५० किलो वजनाचे दोन कट्टे एकुन अंदाजे ८,०००/-रु. किमतीचे. त्यानंतर मी व आमचे वस्तीवरील लोकांनी आजुबाजुस बाहेर येवुन पाहीले असता आमचे गावाजवळील ढोराळे येथील सतीश मधुकर शिंदे याची दोन मुले 1) आनंद सतीश शिंदे 2) शाहीर सतीश शिंदे हे त्यांचे जवळील मोटारसायकल वर सोयाबीनचे कट्टे घेवुन जात असताना वस्तीवरील लाईटचे उजेडात दिसुन आले. मी व आमचे वस्तीवरील तेथे जमलेल्या लोकांनी त्यांचा पाठलाग केला असता ते मोटारसायकल वर सोयाबीनचे कट्यासह पळुन गेले. त्यानंतर सकाळी 06.00 वा. चे सुमारास मला समजले की, आमचे गावातील मोहोळ रोडवर असलेल्या नागनाथ श्रीरंग जाधव यांचे वस्तीवरील अगणात ठेवलेले
1) सोयाबीनचे ५० किलो वजनाचे १६ कट्टे एकुन अंदाजे ३२,०००/- रुं. किमतिचे कट्टे चोरुन घेवुन गेले आहेत. तरी दि.२६/१०/२०२१ रोजी रात्री ९.३० वा. ते दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.०० वा. चे दरम्यान इसम नामे १) आनंद सतीश शिंदे २) शाहीर सतीश शिंदे दोघे रा. ढोराळे ता. बार्शी यांनी मोटारसायकल वर येवुन जाधव वस्तीवरील दहिटने येथुन माझे अंगणात ठेवलेले सोयाबिनचे कट्टे त्यातुन १) सोयाबीनचे ५० किलो वजनाचे दोन कट्टे एकुन अंदाजे ८०००/-रु. व आमचे गावातील मोहोळ रोडवर असलेल्या नागनाथ श्रीरंग जाधव यांचे वस्तीवरील अंगणात ठेवलेले नागनाथ जाधव यांचे २) सोयाबीनचे ५० किलो वजनाचे भ१६ कट्टे एकुन अंदाजे ३२,०००/- रुं. असे एकुन ४०,०००/- रु. किमतीचे सोयाबीनचे कट्टे आमचे समतीशिवाय, मुद्दाम लबाडीने चोरुन नेले आहेत.