परंडा: परंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यास लाथा – बुक्क्यांनी मारहाण करुन ब्लेडने वार करुन जखमी करण्यात आले, याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परंडा नगरपरिषदचे मुख्याधिकारी दिपक नारायण इंगोले हे शासकीय कामानिमीत्त दि. 10.01.2021 रोजी 18.10 वा. सु. वारदवाडीकडे जात होते. यावेळी परंडा- वारदवाडी रस्त्यावर अनिल मधुकर गोराडे, रा. परंडा यांनी श्री दिपक इंगोले यांची गाडी आडवली.

“तुम्ही आधी कोविड सेंटर फवारणीच्या माझ्या बिलाचे पैसे द्या नाही तर मी तुम्हाला सोडणार नाही.” अशी धमकी इंगोले यांना देउन व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन ब्लेडने इंगोले यांच्यावर वार करुन त्यांना जखमी केले. यावेळी इंगोले यांच्या गाडी चालकाने इंगोले यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. यावरुन दिपक इंगोले यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन अनिल गोराडे यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 353, 332, 341, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.