बार्शी : बार्शी शहर व तालुक्यातील मंगळवारी प्राप्त झालेल्या 415 तपासणी अहवालामध्ये 73 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. शहरातील 51 तर ग्रामीणमधील 22 असे रुग्ण आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 3 हजार 543 झाली आहे. बरे होऊन 2 हजार 492 जण घरी गेले आहेत. 126 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक ढगे यांनी दिली.

शहरातील 313 व ग्रामीणमधील 102 असे 415 अहवाल प्राप्त झाले. शहरातील 628 व ग्रामीणमधील 194 असे 832 जणांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत शहरातील 68 तर ग्रामीणमधील 58 अशा 126 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात 95 तर ग्रामीणमध्ये 22 अशा 117 जणांवर उपचार सुरु आहेत. शहरातील 262 तर ग्रामीणमधील 80 असे 342 जण मंगळवारी निगेटिव्ह आले.

आज नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये नाईकवाडी प्लॉट पाच, अध्यापक कॉलनी चार, भगवंत मंदिरजवळ, भवानी पेठ, उपळाई रोड, जावळी प्लॉट, येथे प्रत्येकी तीन, फुले प्लॉट, सोमवार पेठ, शिवाजीनगर, वाणी प्लॉट येथे प्रत्येकी दोन रुग्ण बाधित आढळले. सिध्देश्वर नगर, कुर्डुवाडी रोड, बुरुड गल्ली, सुभाषनगर, खानापूर रोड, मिरगणे कॉम्प्लेक्स, पाटील चाळ, ढगे मळा, हंडे गल्ली, अलिपूर रोड, कसबा पेठ, चोरमुले प्लॉट, नवीन पोलिस लाईन, पाटील प्लॉट, जयशंकर मिलजवळ, एकता गणपतीजवळ, भीमनगर, पंकज नगर, टिळक चौक, मंगळवार पेठ, झाडबुके मैदान येथे प्रत्येकी एक जण कोरोनाबाधित आढळला आहे.

ग्रामीण भागातील उपळे दुमाला, शेळगाव प्रत्येकी तीन, उपळाई ठोंगे, झाडी, ताडसौंदणे प्रत्येकी दोन तर चिखर्डे, काळेगाव, पानगाव, चारे, चिंचोली, हिंगणी, घाणेगाव, उक्कडगाव, आगळगाव, गुळपोळी येथे प्रत्येकी एक जण कोरोनाबाधित आढळला असून 12 अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती डॉ. ढगे यांनी दिली.