पंढरपूरचे वैभव लोपले. !! वाचा सविस्तर-

0
647

पंढरपूरचे वैभव लोपले. !!

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ सोलापूर जिल्ह्यातील सहकार व राजकीय क्षेत्रात
शांत..संयम..सालसतेनी नेतृत्व करुन सुधाकरपंत परिचारक यांनी स्वत:चं असं वेगळ वलय निर्माण केलं. पंढरपुर मतदार संघातुन सलग पाच वेळा विजयी होत सलग पंचवीस वर्षे विधानसभेत ते कार्यरत होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सुधाकरपंत परिचारक जे बोलत असतं तेच कार्य प्रत्यक्षातही करुन दाखवित असतं.सुधाकर परिचारक यांचं मुळ गाव पंढरपूर पासून अगदी जवळ असणारं खर्डी हे गाव.
संत सिताराम महाराजांच्या पदस्पर्शानी पावन झालेल्या खर्डी गावांनी निस्पृह नेता साऱ्यांनाच दिला.सात्विक आचरण… आध्यात्माचा आभ्यास ..शांत नी संयमीवृत्ती…त्यामुळेच सुधाकर परिचारक यांना
राजकारणातील संत ही उपाधी देण्यात आली.

विठ्ठलाच्या मंदिराजवळच असणाऱ्या
परिचारक वाड्यामध्ये कायमच कार्याकर्त्याची वर्दळ असे . पांडुरंगाच्या दर्शनानंतर सुधाकरपंत परिचारक यांच्या पायावर डोकं टेकवूनच दर्शन घेऊन मगच लोक पुढे जात असतं.
पंतांनी अगणीत सहकारी साखर कारखाने जे डबघाईस आलेले होते…कर्जात पार मी बुडुन गेलेले होते असे चालवण्यास घेतले.पूर्णपणे कर्जमुक्त करुन कोट्यावधी रुपयांच्या फायद्यात आणून दाखवलेले आहेत.

अनेक सहकारी पतसंस्था बॅंका यावरही आभ्यास करुन
त्यांनाही योग्य दिशा देऊन नफ्यात आणलेल्या आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे आपली एस टी ची बससेवा .‌‌.ही देखील तोट्यात सुरु होती.‌‌..आता कधीही बंद होईल अशा स्थितीत असताना.यामंडळाचे अध्यक्ष झाल्यावर हिच बस सेवाही नफ्यात आणुन दाखवलेली होती.

आशा सहकारक्षेत्रातील अलौकिक कामगिरी मुळेच सुधाकर परिचारकांना सहकार क्षेत्रातील डॉक्टर म्हणून उपाधी देण्यांत आली.कारण अनेक उद्योग समुह जे आडचणीत आहेत…तोट्यात आहेत अशा उद्योगांना फायद्यात आणण्यासाठी त्यांनी अविरतपणे कार्या हे केलेले आहे.
परिचारिकांच्या कार्या विषयी सांगायचे झालेच तर पांडुरंग सहकारी साखर कारखाना , पंढरपूर अर्बन बँक , भीमा सहकारी साखर कारखाना , युटोपियन शुगर , कर्मयोगी विद्यानिकेतन , दामाजी सहकारी साखर कारखाना , पंढरपूर तालुक्यातील ६० सोसायट्या , दूध उत्पादन संघ अशा अगणित उद्योग समुहाच्या माध्यमातून हजारो लोकांना जो आज रोजगार उपलब्ध झालेला आहे तो याच निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या सुधाकर परिचारक यांचं व्यक्तीमुळे.

परिचारकांच्याच अथ परिश्रमा मधुनच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात मोठे जाळे विणले गेले.
सुधाकर परिचारकांनी सोलापूर जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या बरोबर कार्य केले आहे. स्व. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील , नामदेवराव जगताप , भाई एस.एम.पाटील , रतनचंद शहा , बाबुराव आण्णा अनगरकर , कि.रा.मर्दा मारवाडी वकील , बबनराव शिंदे , दिलीप सोपल , शेकापचे गणपतराव देशमुख , माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील ,अशा अगणित लोकांबरोबर अतिशय पोटतिडकीने कार्य पंतांनी केलेले आहे. त्यांच्याच संस्कारामुळे त्यांचे पुतणे आमदार प्रशांत परिचारक हे आज राजकीय क्षेत्रात मोठ्या अभिमानाने कार्यरत आहेत.

सुधाकरपंत परिचारक १९७८ साली पराजीत झाल्यावर त्यांनी १९८५सालात अगदी प्रथमच कॉंग्रेसच्या माध्यमातून विधानसभेत प्रवेश केला.त्यानंतर मात्र पंतांनी सलग पाच निवडणुकीत विजयी झाले.१९९९ सालात शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर अकलुजच्या मोहिते-पाटील यांच्या बरोबरच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

पंत हे शरद पवारांचे ते एक चांगले मित्र हे कायमचेच होते.शरद पवारही पंढरपूरातील पंताच्या निवासस्थानी नेहमीच जातं असतं. २००९ साली परिचारिकांनी सर्वपक्षीय नेत्यांच्यासाठी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी आपली हक्काची पंढरपूरातील जागा सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला हे विशेष होते. २०१५ सालात त्यांच्या पुतण्यासाठी
सर्व पक्षीय नेत्यांनी मोलाची मदत केली.महायुतीकडे संख्याबळ नसताना देखील प्रशांत परिचारक हे विक्रमी मतांनी विजयी झाले यावरुनच सुधाकरपंत परिचारिकांच्या शब्दाला किती मोल आहे दिसुन आले.

गेल्या पाच-सहा दशकात
सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील….साखर कारखानदारी क्षेत्रातील उद्योगांना वैभवाकडे घेऊन जाणारा पंढरीचा संत आज वैकुंठाला निघून गेलेला आहे.
आज पंढरीचं वैभव अनंतात विलीन झालं हे बाकी खरं .‌‌….

सुधीर कोर्टीकर
जुई , अपार्टमेंट , बी-६ , तिरुपती पार्क , गुरुसाहनी नगर , एन-४ , सिडको ,
औरंगाबाद
मो नं.९७६५५५३३१२
||||||||||||||||||||||||||||||||||||||||

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here