अव्वाच्या सव्वा दराने व्याजाची आकारणी करणाऱ्या तीन सावकारांविरोधात बार्शीत गुन्हा दाखल

0
442

प्रतिनिधी | बार्शी

व्यवसाय उभारणीकरिता व कौटुंबिक गरजेपोटी खाजगी सावकाराकडून दरमहा २० टक्के व्याजदराने घेतलेल्या रक्कमेची व्याजासह परतफेड करूनही अव्वाच्या सव्वा दराने व्याजाची आकारणी करून बेकायदेशीरपणे पैशासाठी तगादा लावून ऋणकोला शिवीगाळ, दमदाटी करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तीन सावकारांविरोधात बार्शी शहर पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आकाश नारायण मस्के रा.राऊत चाळ बार्शी, जयपाल विश्वनाथ वाघमारे रा.अलिपूर रोड बार्शी, प्रसन्नजित गौतम नाईकनवरे रा. भीमनगर बार्शी अशी गुन्हा दाखल झालेल्या खाजगी सावकारांची नावे आहेत. विकास बळवंत शेटे (वय ५६ रा. दहिहांडे वाडा, नाईकवाडी प्लॉट बार्शी ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे इलेक्टॉनिक वस्तू विक्रीचा व्यवसाय असून दुकानातील सामान खरेदीसाठी भांडवलाची आवश्यकता असल्याने त्यांनी आकाश मस्के याच्याकडून दि. १ जानेवारी २० ते २७ सप्टेंबर पर्यत वेळोवेळी एकूण १४ लाख रूपये २० टक्के दरमहा दराने व्याजाने खाजगी सावकारी कर्ज घेतले होते. मस्केकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड म्हणून २० लाख देवूनही मस्केच्या मतानुसार ५३ लाख रूपये बाकी आहे.

आकाश मस्केचे व्याजाचे पैसे देण्यासाठी कमी पडल्याने फिर्यादीने जयपाल वाघमारे याचेकडून २५ मे रोजी २ लाख दरमहा २० टक्के दराने घेतले. त्यापोटी फिर्यादीने जयपालला ४.५ लाख दिले. तरी जयपाल ८ लाख रूपये मागत आहे. त्याचप्रमाणे प्रसन्नजीत नाईकनवरे याचेकडून दि. ३१ ऑगस्ट रोजी दीड लाख रूपये १५ टक्के दर आठवडा दराने घेतले होते. त्याने हातउसनवारी पावती नोटरी केली होती व त्याने त्या नोटरीत २ लाख रूपये लिहिले होते.

फिर्यादीस पैशाची गरज असल्याने त्या नोटरीवर सही केली होती. पैसे येताच फिर्यादीने जयपाल वाघमारे यास ३० हजार दिले होते. अदयापपर्यंत नाईकनवरे यास दीड लाख रूपये दिले असून तो मुद्दल, व्याज व दंड मिळून १९ लाख रूपये शिल्लक राहिल्याचे सांगत आहे. तिघेही सावकार मोबाईल फोनवरून व्याज व मुद्दलाच्या पैशासाठी वेळोवेळी फोन करून तगादा लावत आहेत, पैसे न दिल्यास मारून टाकण्याची धमकी देत आहेत अशा आशयाची फिर्याद दिली आहे. त्यावरून तीनही सावकारांवर महा.सावकारी (नियमन )अधि. २०१४ चे कलम ३९, ४५ सह भादंवि ३२३, ५०४, ५०६, ५०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here