पैशाचा तगादा व दमदाटी प्रकरणी
सहा सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल
बार्शी प्रतिनिधी
घेतलेल्या कर्जाची मुद्दल व व्याजाचे पैसे परत न
दिल्याच्या कारणावरून मागील १५ दिवसापासुन फोन करून,पैशासाठी तगादा लावुन घरी येवुन दमदाटी व शिवीगाळी करून चेक घेवुन जावुन एकास मानसीक त्रास दिल्या प्रकरणी विश्वास बलभिम जाधवर या शिक्षकांने दिलेल्या फिर्यादीवरून सहा सावकारांविरुद्ध शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे . यात बाभुळगावचे ४ सावकार तर तेरखेडा व वडजी ता वाशी चे दोन सावकारांचा समावेश आहे.

नंदकुमार शिंदे , गोंविद शिंदे ,पप्पु धनाजी उकीरंडे व विजय शंकर झिने (चौघे रा.बाभुळगांव ता.बार्शी तर नारायण खापे (रा तेरखेडा ता.वाशी) केशव नारायण मोराळे (रा.वडजी ता.वाशी) असे सहा जणांविरुद्द सावकारकीचा गुन्हा दाखल झाला.
जाधवर याने फिर्यादीत म्हटले खाजगी कौंटुबिक गरजेसाठी व आर्थिक अडचणीमुळे सुमारे 3 वर्षापुर्वी नंदकुमार शिंदे याचेकडुन दोन लाख रूपये दरमहा 5 टक्के व्याजाने घेतले होते. त्यावेळी तारण कोरा चेक सही करुन दिला होता. तसेच नंदकुमार यांचे कर्जाची मुद्दल, व्याज देणे शक्य नसल्याने फिर्यादीने सुमारे दिड वर्षापुर्वी गोंविद शिंदे याचेकडुन दिड लाख रूपये दरमहा ६ टक्के व्याजाने व पप्पु धनाजी उकीरंडे रा.बाभुळगांव ता.बार्शी यांचेकडुन दोन लाख रूपये दरमहा ४ टक्के व्याजाने घेतले होते.

परंतु सावकारी कर्जाची मुद्दल व व्याज वाढत गेल्याने पुन्हा एक वर्षापुर्वी विजय झिने याचेकडुन पन्नास हजार रूपये दरमहा ५ टक्के व्याजाने घेतले तर तेरखेडा येथील नारायण खापे याचेकडुन चाळीस हजार रूपये दरमहा ७ टक्के व्याजाने घेतल्याने सदर कर्जाचे व्याज सावकाराकडे दिले त्यानंतर मागील दहा महिन्यापुर्वी केशव मोराळे याचेकडुन चाळीस हजार रूपये दरमहा १० टक्के व्याजाने सावकारी कर्ज घेतले होते.
मागील तीन वर्षापासुन आर्थिक अडचणीमुळे वेळोवेळी वरिल सावकाराकडुन कर्ज घेवुन त्याचे व्याज सावकाराकडे देत होते. परंतु सर्व सावकारांचे कर्ज जास्त झाल्याने फिर्यादीस व्याज भरणे शक्य होत नसल्याने मागील दोन महीन्यापासुन कर्जाचे व्याज देणे बंद केले होते. यामुळे तरी सावकारी कर्जाचे व्याज देत नाही या कारणामुळे पप्पु धनाजी उकीरंडे याने सुमारे 15 दिवसापुर्व घरी येवुन दमदाटी करून कर्जाचे व्याज म्हणुन ८० हजार रूपये चा चेक घेवुन गेला होता.
तसेचदि. २ नोव्हेंबर रोजी ६० हजार रू चा चेक नातेवाईक सुनिल महादेव नेटके याचे याचेकडे देण्यास सांगितला होता.मी पप्पु उकीरंडे यास पैसे देवुन ही त्याने मला दि. १४ नोव्हेंबर रोजी वांरवार फोन करून दमदाटी करून आणखीण व्याजाचे पैशाची मागणी केली होती.तसेच केशव मोराळे यांने कर्ज व व्याजाची वसुली करणेसाठी दि.१० नोव्हेंबर रोजी फिर्यादीच्या घरी येवुन घरातील लोकाना मारहाण व त्याची बदनामी करण्याची धमकी देवुन माझेकडुन एक लाख रू रक्कमेचा चेक घेवुन गेला आहे.तसेच नंदकुमार शिंदे यांनी यापुर्वी माझेकडुन तारण म्हणुन एक कोरा चेक सही करून घेतलेला असुन शिंदे यानी त्याचे मोबाईल वरून मला वांरवार फोन करून घेतलेले कर्जाचे मुददल व व्याज दे नाहीतर आम्ही तुला मारून टाकुन शाळेमधुन पैसे वसुल करू तुझ काय हिशोब आहे तो आम्ही येत्या सोमवारी बघु अशी दमदाटी केली होती.
तसेच नारायण खापे यानी फिर्यादीस मोबाईलवर फोन करून पैसे नाही दिले तर मारून टाकण्याची धमकी दिली होती.व पैशावरुन विजय शंकर झिने तसेच गोविंद शिंदे यांनीही धमकी दिल्याचे म्हटले आहे अधिक तपास शहर पोलीस करित आहे