सोलापूर/प्रतिनिधी:
पंधराव्या वित्त आयोगातून सोलापूर जिल्ह्यातील १०२८ ग्रामपंचायती साठी एकूण ११० कोटी रुपये अनुदान आले आहे व ते ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे अशी माहिती उप मुख्यकार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी माध्यमांना दिली.

त्यानुसारच बार्शी तालुक्यातील १२९ गावांसाठी ९.३७ कोटी निधी वर्ग करण्यात आला आहे. तर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १७.०३ कोटी निधी माळशिरस तालुक्यातील १०७ गावांसाठी वर्ग केला गेला आहे.तर पंढरपूर तालुक्यात ही ९४ गावे असून १२.६७ कोटी निधी जमा करण्यात आला आहे. त्यामानाने गावे व निधी ची आकडेवारी पाहता करमाळा तालुक्याला कमी निधी मिळाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय निधी खालीलप्रमाणे
माळशिरस – १०७ गावे १७.०३ कोटी
पंढरपूर – ९४ गावे १२.६७ कोटी
माढा – १०८ गावे ११.०२ कोटी

अक्कलकोट – ११७ गावे ९.४१कोटी
बार्शी –१२९ गावे ९.३७ कोटी
करमाळा – १०५ गावे १० कोटी
मोहोळ – ९४ गावे ९.६७ कोटी
उ.सोलापूर – ३६ गावे ४.१६ कोटी
सांगोला – ७६ गावे १०.९८ कोटी
मंगळवेढा – ७९ गावे ७.११ कोटी
द.सोलापूर – ७३ गावे ९.८० कोटी