उच्चविचारसरणीचे जुन्या काँग्रेस विचारधारेचे परंडा तालुक्यातील नेते,कालिदास दादा खैरे.
काँग्रेस हा फक्त पक्ष नसून विचारधारा आहे,कित्येक वेळा याचे अनुभव देखील मांडले जातात. गाव – पाचपिंपळा,तालुका. परंडा जिल्हा. उस्मानाबाद या गावातील त्याकाळचे तरुण नेतृत्व म्हणून खैरे दादा यांचं नाव जुन्या पिढीतील लोकांकडून उच्चारण्यात येते.

खैरे दादांचा इतिहास म्हणजे त्यांना ज्यावेळी मतदानाचा अधिकार आला त्यावेळी म्हणजे १९६७ सली ते स्वताच्या वार्ड मधून बिनविरोध निवडून आले व तिथून पुढे त्यांनी १८ वर्ष सरपंच या पदाचा कार्यभार स्वीकारला.
दरम्यान त्यांनी जवळा या गटातून पंचायत समिती वर स्थान मिळवले. विविध कार्यकारी सेवा संस्था परंडा येथे बराचसा काळ चेअरमन व संचालक म्हणून जबाबदारी पार पाडली.


त्यांची राजकीय कारकीर्द वाढतच गेली,नंतर युवक काँग्रेस परंडा तालुका अध्यक्ष म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली याच काळात लातूरचे हृदयस्थान मा.विलासराव देशमुख साहेब हे देखील लातूर युवक काँग्रेस अध्यक्ष पदी होते. यातूनच साहेबांची व खैरे दादांची जवळीक झाली , साहेबांच्या कारकिर्दीत त्यांनी खैरे दादांना अनेक पदांवर विशेष स्थान दिले व खैरे दादांनी ती सर्व जबाबदरी अतिशय चांगल्या प्रकारे पार पडली.
खैरे दादा हे जनमानसातील नेतृत्व म्हणून पुढे आलेले नेते असे त्यांची ओळख. समाजकारण ही एकच गोष्ट ज्यावर त्यांनी स्वतःचा ठसा जनमानसात मांडला,याची प्रचिती तेंव्हा सुध्दा येते जेंव्हा आपण त्यांच्याशी चर्चा करत असतो.सध्याच्या राजकारणी विचारांपेक्षा जुन्या पिढीतील राजकारण्यांचे विचार किती वेगळे असतात याचा जणू चित्रपटच समोर उभा राहतो. परंडा तालुक्यातील सर्वच पक्षातील नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध मग तो मित्रपक्ष असो वा इतर पक्ष,नेहमीच ते सर्व नेत्यांशी आपुलकीनं वागतात.

खैरे दादांचा उल्लेख करायचं निमित्त म्हणजे दि.३ जुलै रोजी त्यांचा अमृतमोहत्सवी ७५ वा वाढदिवस त्यांच्या राहत्या घरी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
