शिक्षिका आईने मुलाचा वाढदिवस केला रक्तदानाने साजरा
बार्शी: प्रमिला युवराज जगताप ( शिक्षिका जि. प.कन्या माणकेश्वर)यांनी आपला मुलगा ऋतुराज युवराज जगताप (इयत्ता ८ वी महाराष्ट्र विद्यालय बार्शी)याचा १४वा वाढदिवस रक्तदानाने साजरा केला.


आज दि:-०३/०१/२०२२ रोजी ऋतुराज ची आयुष्याची १४ वर्ष पूर्ण होऊन १५ व्या वर्षात पदार्पण केले या वाढदिवसाच्या निमित्त बार्शी येथील श्रीमान राम भाई शहा रक्तपेढीत जाऊन प्रमिला जगताप यांनी रक्तदान करून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.बार्शी येथील दत्त प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले कवी श्री.युवराज गोवर्धन जगताप यांच्या त्या अर्धांगिनी आहेत
रक्त दानाचे कार्य खूप पवित्र कार्य असून समाजातील प्रत्येक घटकांनी रक्तदान करावे हा संदेश समाजात जावा व सामाजिक बांधिलकी सर्वांनी जपावी ही तळमळ या शिक्षक दाम्पत्याच्या कृतीतून दिसून येते या त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.