पावसाळ्यातील साथीचे आजार पसरू नये याची काळजी घ्या — आमदार राजेंद्र राऊत

0
264

आमदार राजेंद्र राऊत यांची बार्शी नगरपरिषदेत आढावा बैठक

पावसाळ्यातील साथीचे आजार पसरू नये याची काळजी घ्या — आमदार राजेंद्र राऊत

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी: आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी नगरपरिषद सर्व खातेप्रमुख अधिकारी व ठेकेदार यांची संयुक्त आढावा बैठक घेतली. या बैठकीत बार्शीकर नागरिकांच्या आरोग्याची काळजी, विविध विकास कामासंबंधीचा आढावा, पाणीपुरवठा संबंधीचा आढावा घेण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरणातील ,बदल व पावसाच्या कमी-जास्त प्रमाणामुळे पावसाळ्यातील साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. हे आजार पसरू नये व या आजारापासून बार्शीकर बाधित होऊ नये म्हणून बार्शी नगरपालिकेच्या आरोग्य खात्याने योग्य ते नियोजन करावे व जनजागृती करावी. त्याचबरोबर नागरिकांना त्वरित व अचूक रोग निदान करण्याकरता आजार नियंत्रण व उपाय योजनेच्या माध्यमातून जनजागृती करावी जेणेकरून यामुळे या आजारांवर नियंत्रण मिळवता येईल.

सध्या बार्शी नगरपरिषदे मार्फत बार्शी शहरातील प्रत्येक प्रभागात डास प्रतिबंधक मेलीथिऑन औषधाची एसटीपी द्वारे फवारणी सुरू आहे. या औषध फवारणीमुळे डासांपासून उद्भवणा-या डेंगू,मलेरिया सारख्या आजारांना अटकाव बसेल. 

बार्शी शहरातील अनेक भागात सध्या विविध विकास कामे सुरू आहेत. या कामांची पाहणी आमदार राजेंद्र राऊत हे वेळोवेळी प्रत्यक्ष कामावर जाऊन करत आहेत. या बैठकीत त्यांनी शहरातील सुरू असलेल्या विकास कामांबाबत अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्याशी चर्चा करून कामाची प्रगती, कामे करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. विकास कामे सुरू असताना नागरिकांची थोड्याफार प्रमाणात गैरसोय होत आहे ही गैरसोय होत असल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करून बार्शीकरांसाठी चांगल्या सोयीसुविधा, प्राथमिक गरजा देण्याकरता आम्हीं कटिबद्ध आहोत यासाठी नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले.

बार्शी शहराच्या पाणीपुरवठा याबाबतही या बैठकीत चर्चा झाली असून शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासंबंधी आमदार राजेंद्र राऊत यांनी संबंधितांना सूचना केल्या. त्याच बरोबर चांदनी पाणी पाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्र लवकरच सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

या आढावा बैठकिला नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील , पक्षनेते विजय राऊत, कार्यालय अधीक्षक शिवाजी कांबळे, नगर अभियंता भारत विधाते, दिलीप खोडके, जलदाय अभियंता अजय होनखांबे, आरोग्य अधिकारी जयसिंग खुळे, ज्योती मोरे, करअधिकारी मयुरी शिंदे, संबंधित ठेकेदार उपस्थित होते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here