उस्मानाबाद पोलीस मुख्यालयातील दोन पोलीस निरीक्षक निलंबित

0
738

उस्मानाबाद : वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश न पाळणे, तसेच कोरोनाच्या काळात कामावर हजर न राहणे, बेशिस्त, बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेवत उस्मानाबाद पोलीस मुख्यालयातील दोन पोलीस निरीक्षकांना विशेष महानिरीक्षक निसार तांबोली यांनी निलंबित केले आहे. सदरील दोन पोलीस निरीक्षकांची अनुक्रमे तुळजापूर व उमरगा येथून पोलीस मुख्यालयात बदली झाली होती. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

दि. १ नोहेंबर २०१९ रोजी एस.आर.ठोंबरे व सुरेश चाटे या पोलीस निरीक्षकांची रोजी अनुक्रमे तुळजापूर व उमरगा येथून उस्मानाबाद पोलीस मुख्यालयात बदली झाली होती. त्यानंतर हे दोघे मुख्यालयात रुजू होऊन लगेच वैद्यकीय रजेवर गेले होते. दोन वर्षाच्या आत बदली केली म्हणून उभयतांनी मॅट मध्ये धाव घेतली असतानाच त्यांच्या निलंबनाचा आदेश निघाला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता रजेवर जाणे, कोव्हीड सारख्या महामारीच्या काळात कामावर हजर न होणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश न पाळणे असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. राजपत्रित अश्या जबाबदार पदावर असताना, बेशिस्त, बेजबाबदार वर्तन केल्यामुळे आपणस निलंबित करण्यात येत आहे, निलंबन काळात उस्मानाबाद पोलीस मुख्यालयात दैनंदिन हजेरी लावावी, असे निलंबन आदेशात म्हटले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here