आदित्य ठाकरे यांच्यासोबत फोटोत सुशांतसिह राजपूत यांची प्रेयसी नव्हे तर…..!

0
515

आदित्य ठाकरे यांच्यासोबत फोटोत सुशांतसिह राजपूत यांची प्रेयसी नाही…..!

अभिनेता सुशांतसिह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. त्यातच हे प्रकरण CBI कडे देण्याची मागणी अनेकांकडून होताना दिसत दिसून येत होती. मात्र हे प्रकरण हाताळायला मुंबई पोलीस सक्षम आहे असे ठाम मत गृहमंत्री देशमुख यांनी बोलून दाखविले होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

त्यात मंत्री आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्याच्या हेतूने एका फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसून आला होता. या फोटोत मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत बसलेली मुलगी ही सुशांतसिह राजपूत यांची प्रेयसी असल्याची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरताना काही मंडळी दिसून आली होती.

त्यात आर न्युजचे अर्णब गोस्वामी यांनी फोटो ट्विट करत आदित्य ठाकरे यांच्यासोबत गाडीत बसलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आहे असा दावा त्यांनी केला होता. मात्र त्या फोटोत दिसणारी ती व्यक्ती रिया चक्रवर्ती नसून दिशा पटानी आहे हे फोटोत पाहिल्यावर दिसून येत आहे.

खरं तर या दाव्यांची वेगळी पडताळणी करायची काहीच आवश्यकता नाही, कारण फोटोत आदित्य ठाकरे यांच्यासह दिसणारी तरुणी ही सुशांत राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती नसून अभिनेत्री दिशा पटानी आहे, हे अगदी सहज ओळखता येऊ शकतं.

हा फोटो नेमका कुठल्या औचित्यावर घेण्यात आलाय हे शोधण्यासाठी मात्र आम्ही ‘गुगल रिव्हर्स सर्च’च्या मदतीने पडताळून बघितला. आम्हाला ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वेबसाईटवर १२ मार्च २०१९ रोजीचं फोटो फिचर सापडलं.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here