बार्शी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परिक्षा, २०१९ चा अंतिम निकाल जाहीर झाला असून, त्यामध्ये बार्शी येथील मुजम्मिल मुख्तार शेख यांची सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता पदावर निवड झाली आहे.

त्यांनी बार्शीतील भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथून २०१८ मध्ये बी. ई (स्थापत्य अभियांत्रिकी) पदवी पूर्ण केली व पदव्युत्तर शिक्षण विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर येथून (स्ट्रक्चरल अभियांत्रिकी) पूर्ण केले आहे. या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा