सोलापूर शहरासोबत ग्रामीण भागातील काही तालुक्यात वाढत चाललेला कोरोना (कोविड-१९) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक १६ जुलैच्या मध्यरात्री पासून दि.२६ जुलैपर्यंत (दहा दिवस) संचारबंदी लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील या गावात असणार संचारबंदी
संचारबंदी लागू करण्यात आलेली गावे
उत्तर सोलापूर- ,मार्डी, तिर्हे, पाकणी, कोंडी, बाणेगांव, नान्नज, तळे हिप्परगा, हगलूर, एकरुख, कारंबा, भोगांव
दक्षिण सोलापूर- कुंभारी, विडी घरकुल, वळसंग, मुळेगांव, मुळेगांव तांडा,बोरामणी, होटगी, लिंबी चिंचोळी, बक्षिहिप्परगा, कासेगांव, उळेगांव, तांदुळवाडी

अक्कलकोट -अक्कलकोट शहर
मोहोळ- मोहोळ शहर, कुरुल, कामती खु., कामती बु.
बार्शी शहर, वैराग
सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यातील गावांमधील
सर्व किराणा दुकान, सर्व किरकोळ व ठोक विक्रते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने, सर्व प्रकारचे उद्योग संपूर्णत: बंद राहतील.
सर्व राज्य शासनाचे / केंद्र शासनाचे कार्यालये तसंच शासन अंगीकृत उपक्रम व स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये कोरोना (कोव्हिड-१९) संबंधित कार्यरत असणारे सर्व कार्यालये /उपक्रम वगळून बंद राहतील.

रेशन दुकानांसह कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहील.
सार्वजनिक /खाजगी क्रिडांगणे, मोकळ्या जागा, उद्यान, बगीचे, मॉर्निग वॉक सर्व संपूर्णत: बंद राहतील.
उपहार गृह, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट, संपूर्णत: बंद राहतील. मात्र उपहार गृहामधून फक्त घरपोच सेवा चालू राहील. व लॉजिंगचे नविन बुकींग या आदेशानंतर बंद करण्यात येत आहे. सर्व केश कर्तनालय/सलुन। स्पाँ/ब्युटी पार्लर दुकाने संपूर्णत: बंद राहतील.

सर्व किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे आडत, भाजी मार्कट फळे विक्रेते/ आठवडी व दैनिक बाजार/ मार्कट ही सर्व ठिकाणे संपूर्णत: बंद राहतील.मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादींची विक्री संपूर्णत: बंद राहील.
शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णत: बंद राहतील.
सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने, दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनं संपूर्णत: बंद राहतील.

सर्व प्रकारचे बांधकाम कन्स्ट्रक्शनची कामे संपूर्णत: बंद राहतील. तथापि, ज्या बांधकामाच्या जागेवर
कामगारांची निवास व्यवस्था (In-situ Construction) असेल त्यांना काम सुरू टेवता येईल. सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्यान, नाट्यगृह, यार, प्रेक्षागृह, सभागृह, संपूर्णत: बंद राहतील.
सर्व प्रकारचे मंगल कार्यालय, हॉल तसेच लग्न समारंभ, स्वागत समारंभ संपूर्णत: बंद राहतील.
सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापना कार्यालये संपूर्णत: बंद राहतील. सामाजिक,राजकीय/क्रीडा मनोरंजन/ सांस्कृतिक /धार्मीक कार्यक्रम व सभा संपूर्णत: बंद राहतील.धार्मीक स्थळे, सार्वजनिक प्रार्थना स्थळे संपूर्णत: बंद राहतील.

सर्व राष्ट्रीयकृत व आर.बी.आय, ने मान्यता दिलेल्या बँका, सहकारी बैंका यांचे अंतर्गत व्यवहार चालू
राहतील व नागरिकांसाठी बँकेचे व्यवहार बंद राहतील. बँकेचे इतर ग्राहकसेवा जसे ऑनलाईन, बैंकेची एटीएम व एटीएम शी निगडीत सेवा सुरु राहतील. असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
दुध विक्रेते यांना घरपोच दूध वितरणासाठी सकाळी ९ वाजेपर्यंत परवानगी राहील, त्यांना एका ठिकाणी उभे राहून दुध विक्री करता येणार नाही, सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा , पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील.


क) सर्व रुग्णालये व रुग्णालयाशी निगडीत सेवा आस्थापना त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील.
कोणतेही रुग्णालय लॉकडाऊनचा आधार घेऊन रुग्णांना आवश्यक सेवा नाकारणार नाहीत, अन्यथा
संबंधित रुग्णसेवा संस्था कारवाईस पात्र राहील. सर्व मेडीकल दुकाने, चष्म्याची दुकाने त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील. तसेच औषधांची ऑनलाईन सेवा चालू राहील.
कायदेशीर कर्तव्ये बजावत असणारे अधिकारी व कर्मचारी उदा. आरोग्य, महसूल, पोलीस, पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, अग्निशमन, विभागातील सर्व अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयाचे ओळखपत्राद्वारे परवानगी राहील.

न्यायालयाचे कर्मचारी, अधिकारी, न्यायाधीश, वकील, शासकीय राज्य / केंद्र शासनाचे कर्मचारी,
शासन अंगिकृत कर्मचारी, डॉक्टर नर्स, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, वर्तमानपत्र, प्रिंटीग व
डिजीटल मिडीयाचे कर्मचारी, फार्मा व औषधी संबंधित मेडिकल शॉपचे कर्मचारी, दुध विक्रेते,
अत्यावश्यक सेवा जसे कृषी, बी-बियाणे, खते, गॅस वितरक, पाणी पुरवठा, आरोग्य व स्वच्छता करणारे
शासकीय व खाजगी कामगार, अग्निशमक सेवा, जलनि:सारण तसेच पूर्वपावसाळी व पावसाळया
दरम्यान करावयाची अत्यावश्यक कामे करणारे, यीज वहन व वितरण कंपणीचे कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी तसेच कन्टेमैंट झोन करीता नियुक्त कर्मचारी यांनाच चारचाकी. दुचाकी (स्वत:करीता फक्त) वाहन वापरण्यास परवानगी राहील.

या सर्वकर्मचारी/अधिकारी यांनी स्वत:चे कार्यालयाचे ओळखपत्र तसेच शासकीय कर्मचारी सोडून इतरांनी स्वत:चे आधार कार्ड सोबत ठेवावे व वाहनाचे आवश्यक परवाने सोबत टेवावे. या सर्वांना वाहन फक्त शासकीय कामासाठी अथवा त्यांचे कामाचे जबाबदारी नुसार व शासकीय अथवा त्यांच्या संस्थेने दिलेल्या वेळेतच वापरता येईल.
सर्व वैदयकीय व्यवसायीक, परिचारीका, पॅरामेडीकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व अम्बुलन्स यांना वाहतुकीसाठी परवानगी राहील. पोस्ट कार्यालय सेवा सुरु राहतील,

वैदयकीय सेवा, अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी व त्यांची वाहने व कृषीशी निगडीत चार चाकी वाहनांना पेट्रोल / डिझेल पुरवठा करण्यासाटी पेट्रोल पंप सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत चालू राहतील.
LPG गैस सेवा घरपोच, गॅस वितरण नियमानुसार सुरु राहील. घरगुती गॅस घरपोच सेवा देताना कंपनीचा गणवेश परिधान करावा व त्यांचे गणवेश नसलेला कर्मचारी यांनी ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल.
अंत्ययात्रा व अंत्यविधी साठी या आधी प्रमाणेच नियम लागू आहे.विद्युत सेवा,अग्निशमन सेवा, मोबाईल व दुरसंचार सेवा पुरविणाऱ्या कंपन्या, त्यांचे कर्मचारी यांच्या वाहनांना ओळखपत्राच्या आधारे परवानगी राहील.
सर्व प्रकारची रस्ते, रेल्वे, हवाई वाहतुक सेवा बंद राहील. तथापि, यामधून महत्त्वाच्या व अत्यावश्यक
वस्तूंची ने-आण करणे, अग्निशमन /कायदा व सुव्यवस्था, तसेच तातडीची सेवा इत्यादीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या वाहतुकीस वगळण्यात येत आहे.
या शिवाय इतर कोणतीही व्यक्ती पायी अथवा सायकलवर अथवा चारचाकी अथवा दोनचाकी वाहन घेऊन घराबाहेर फिरणार नाही. असे इतर कोणतीही व्यक्ती वाहन घेऊन विनाकारण फिरत असल्यास त्यांचे चारचाकी/ दुचाकी वाहन जप्त करण्यात येईल. त्यांचा वाहन परवाना रद्द करण्यात येईल व त्यांच्यावर साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार व तत्सम इतर कायद्यातील तरतुदी नुसार गुन्हा नोंद करण्यात येईल.
प्रतिबंधीत सांसर्गीक क्षेत्रामध्ये (Containment Zone) यापुर्वी देण्यात आलेले आरोग्य विषयक सर्व आदेश व सूचना लागू राहतील.
कृषी व कृषी विषयक सर्व उपक्रम चालू राहतील. तसेच बी-बियाणे/ खते/ किटकनाशक औषध/ चारा दुकाने सुरु राहतील व याची वाहतुक चारचाकी वाहनातून करण्यास परवानगी राहील. दुचाकी वाहनास परवानगी असणार नाही. या दुकानांसाठी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत असेल.
शेतमालाशी /कृषी व्यवसायाशी निगडीत प्रक्रिया उद्योग नियमानुसार चालू राहतील. निर्यात होणाऱ्या वस्तुंची वाहतूक शासन नियमानुसार सुरु राहील.
वर्तमानपत्र प्रिंटींग व वितरण, डिजीटल प्रिंट मिडीया कार्यालय शासकीय नियमानुसार सुरु राहतील.
पत्रकारांना त्यांचे ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असेल,पाणी पुरवठा करणारे टँकरला नियमानुसार परवानगी राहील.कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.
संस्थात्मक अलगिकरण, विलगीकरण व कोविड केअर सेंटर करता ताब्यात घेतलेल्या कार्यालयाच्या
जागा, इमारती नियमानुसार सुरु राहतील.