बार्शीत एसटी कंडक्टरला मारहाण; दोघा मद्यपींवर गुन्हा
बार्शी : शहरातील बसस्थानक चौकातून एसटी स्थानकात जात असताना दोघाजणांनी वाहकास दमदाटी व शिवीगाळ केली. बसस्थानकात येऊन मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दादा कातुरे, कन्हैय्या पाटील (दोघे रा. उपळाई रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.


वाहक भुजंग ठोंबरे (रा. ढेकरी, ता. तुळजापूर) यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी पावणेआठच्या दरम्यान घडली. बार्शी-माढा बस (क्रमांक एमएच ४५ बीटी ०९७०) चालक मारुती दराडे यांच्यासह बसस्थानकात येत असताना दोघे मद्यप्राशन करुन चौकात आडवे येत होते. त्यांना बाजूला व्हा, गाडीला वाट द्या असे चालकाने म्हटले.
त्यानंतर त्या दोघांनी चालकास शिविगाळ केली. बसस्थानकात एसटी आल्यानंतर तेथे येऊन दोघांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार करीत आहेत.