श्री.गणेश वस्त्र दालनात कपडे खरेदीसांठी ग्राहकांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद ; चारचाकी गाडीसह विविध बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी
कोरोना या महाभयंकर विषाणू आजारांपासून ग्राहकांचे संरक्षण व काळजी

बार्शी: बार्शी शहरासह आसपासच्या भुम, परंडा, कळंब, कुर्डूवाडी, उस्मानाबाद आदी तालुक्यात अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या श्री. गणेश या भव्य कौटुंबिक वस्त्र दालनात खास ग्राहकांसाठी गेल्या वर्षी पासून फॅमिली खरेदी योजना चालू असून दि. 25 डिसेंबर 2020 पर्यंत रुपये 7000 ची वस्त्र खरेदी करणाऱ्या ग्राहकांस मारुती कंपनीची चारचाकी गाडी, हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल , लेडिज स्कुटर, जेण्टस सायकल, लेडिज सायकल, एलईडी टी.व्ही, होम थियटर, फॅन, इस्त्री, कुकर,मिक्सर, मोबाईल, घडयाळ, हॉट पॉट, वॉटर प्युरिफायर, पर्स,लंच बॉक्स, कुलर, फ्रिज, मनगटी घडयाळ आदी वस्तु लक्की ड्रॉ द्वारे मिळणार आहेत.
एका वेळेस 7000 रु.ची खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकांस एक हमखास आकर्षक भेटवस्तू व बक्षिसांचे कुपन देण्यात येणार असल्याची माहिती उद्योजक महेश यादव यांनी दिली.


शहरातील रोडगा रस्ता गणेश रोड विश्वेश्वर बँकेजवळ
श्री. गणेश हे वस्त्र दालन भव्य चार मजली इमारतीमध्ये असून त्यामुळे बार्शीच्या वैभवात मोठी भर पडली आहे. येथे अत्यंत कमी किंमतीत ग्राहकांना लहानांपासून ते जेष्ठांपर्यंत वस्त्र खरेदीची चांगली सोय उपलब्ध आहे.श्री.गणेश वस्त्र दालनामुळे बार्शी व आसपासच्या तालुक्यातील ग्राहकांना विविध नामांकित कंपन्याचे रेडिमेड्स कपडे,स्त्रियांसाठी सुंदर कॅज्युअल्स ,चुडीदार,लहान मुलांसह जेष्ठांसाठी आकर्षक अशा वस्त्रांचा खजिना खुला असून ग्राहकांचा खरेदीसाठी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
ही फॅमिली खरेदी योजना बार्शीत पहिल्यांदाच चालू झाली असून या योजनेत ग्राहक एका वर्षात रु.7000 पर्यंतची खरेदी करुन सहभागी होऊ शकतो तसेच प्रत्येक ग्राहकास जागेवरच एक हमखास चांगली भेटवस्तू व असून लकी ड्रॉचे कुपन देखील मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ बार्शीसह आसपासच्या तालुक्यातील ग्राहकांनी घ्यावा श्री.गणेश वस्त्र दालनाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला व मनसोक्तपणे कपड्यांची खरेदी केली आहे. योग्य दरांमध्ये दर्जेदार गुणवत्तेची चांगले उत्पादने उपलब्ध केल्याने श्री गणेश वस्त्र दालनांस ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
तसेच कोरोना या महाभयंकर विषाणू आजारांपासून ग्राहकांचे संरक्षण होण्यासाठी त्यांची थर्मल स्कॅनिंग मिटर द्वारे तपासणी करुन तसेच मास्कचा वापर , सेनिटायझर देऊन प्रवेश दिला जात आहे. दुकानातील सर्व कर्मचारी यांना मास्कचा वापर तसेच सर्वांची कोरोना चाचणी करुन आरोग्याची काळजी घेण्यात आली आहे त्यामुळे कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना सुरक्षित सेवा देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला असल्याचे महेश यादव,गणेश नान्नजकर, संतोष जाधवर व बाळासाहेब कामटे यांनी सांगितले.