SP मॅडमची तेजस्वी कामगिरी ; बार्शीत आल्या अन सर्वांची मने जिंकून गेल्या
बार्शी : शहरातील बार्शी तालुका पोलीस ठाणे हे दि ०१ जानेवारी २०२१ रोजीपासुन नागोबाचीवाडी रोड, बायपास बार्शी या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. या स्थलांतरीत इमारतीचे उदघाटन सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते (SP Tejasvi Satapute) यांच्या हस्ते करण्याचे नियोजित होते. मात्र, अधिक्षक मॅडम यांनी मनाचा मोठेपणा दाखवत या इमारतीची फित कापण्याचा मान बार्शी तालुका पोलीस ठाण्यातील एएसआय दिलीप ठोंगे यांना मिळाला. सातपुते मॅडमच्या या तेजस्वी कृतीने पोलीस दलातील सर्वांचीच मने जिंकली. तर, पोलीस ठाण्याचे कर्मचारी ASI ठोंगेही भारावून गेले.


बार्शी तालुका पोलीस ठाणे हे ०१.मे २०१८ रोजी सुरू करण्यात आले होते. तेव्हापासुन सदरचे पोलीस ठाणे हे पांडे चौक, बार्शी येथील जुने बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्ये कार्यान्वीत होते. सदरची ईमारत वापरण्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याने व सदर इमारतीची जागा अपुरी असल्याने तक्रार नोंदविणे करीता
येणारे नागरीकांची गैरसोय होत होती.
तसेच पोलीस ठाणेस येणारे नागरीकांना पार्किंगची व्यवस्था नव्हती. पोलीस अधीक्षक यांनी पोलीस ठाण्याची जागा अपुरी
असल्याने पोलीस ठाणेस तक्रार नोंदविणे करीता अगर
कामाकरीता येणारे नागरिकांची गैरसोय होऊ नये, पार्किंगची व्यवस्था व्हावी व योग्य त्या सोयीसुविधा नागरिकांना मिळाव्यात याकरीता सदर पोलीस ठाण्याचे कामकाज नागोबाचीवाडी रोड बायपास या ठिकाणी असलेल्या प्रशस्त इमारतीतून सुरू करण्यात यावे याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार, हे कामकाज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालं आहे.