सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाचा निकाल 31 ऑक्टोबरपर्यंत होणार जाहीर

0
432

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात आल्या. अंतिम वर्षाच्या नियमित विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल मिळेल अशी माहिती विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या सर्व परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये 99.86% विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली तर 0.14 टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा दिली. केवळ 133 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणीक शहा यांनी दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कोरोना महामारीमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून उन्हाळी 2020 अंतिम वर्ष आणि एटीकेटी तसेच बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन घेण्यात आल्या. या परीक्षेसाठी एकूण 99 हजार 970 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

5 ऑक्टोबरपासून सुरुवातीला एटीकेटी आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरुवात झाली. त्यानंतर 12 ऑक्टोबरपासून अंतिम वर्षाच्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरुवात झाली. या विद्यार्थ्यांच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. एटी-केटी व बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या काही राहिलेल्या परीक्षा लवकरच पूर्ण होतील. नियमित विद्यार्थ्यांबरोबरच एटीकेटी व बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे महाराष्ट्रामध्ये एकमेव विद्यापीठ आहे.

प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या एटीकेटी आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा 1 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत होतील. विविध कारणांमुळे पाच टक्के विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी विद्यापीठास विनंती केल्यास त्यांच्या परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्यात येतील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणीक शहा यांनी दिली.

5 रोजीची परीक्षा 24 ला होणार

तांत्रिक अडचणीमुळे 5 ऑक्टोबर 2020 रोजी काही विद्यार्थ्यांची एटीकेटी आणि बॅकलॉगची परीक्षा झाली नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना त्यादिवशी परीक्षा देता आले नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यांची त्यादिवशी परीक्षा वेळेत पूर्ण झाली नाही, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा 24 ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळेत होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची यशस्वीरीत्या परीक्षा पूर्ण झाली आहे, त्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची गरज नाही. यशस्वीरित्या परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांचे लॉगिन होणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here