बार्शी – आडवा का बोलतो या कारणावरून एकास चाकूने पायावर मारहाण करून तु जर परत आम्हाला आडवा गेला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी मोईन मोबीन नाईकवाडी व अमजद शेखलाल शेख रा. बार्शी यांच्याविरोधात बार्शी तालुका पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.

गुलमोहम्मद अब्दुल लतीफ आतार वय ४४ रा. मंगळवार पेठ, बार्शी हे यात जखमी झाले असून त्यांनी उपचारानंतर फिर्याद दिली आहे. दि. २१ रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास लक्ष्याचीवाडी शिवारातील हॉटेल स्वराज गार्डन येथे हा प्रकार घडला.
दि. २१ रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास फिर्यादी हे घरी असताना त्यांचा मित्र आशपाक मुलाणी याने फोन करून आपल्याला जेवायला बाहेर जायचे असे म्हणून त्यांना घराबाहेर बोलावून घेतले. रात्री ११.१५ वा चे सुमारास ते मोटारसायकलवर सदर हॉटेलवर पोहोचले. हॉटेलच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या झोपडीत ते टेबलवर जेवणासाठी बसले असताना वेटर न आल्याने आशपाक हॉटेल काऊंटरकडे गेला.

त्यानंतर ५ मिनीटात गोंधळाचा आवाज आल्याने त्यांनी समोर पाहिले असता अमजद व मोईन हे शिवीगाळी करत फिर्यादीच्या दिशेने पळत गेले. त्यावेळी मोईन याचे हातात चाकू होता. तू अमजद शेखला आडव का बोलतो, तुला लय माज आलाय का, तुला बघतोच असे म्हणाला त्यावेळी फिर्यादीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असताना मोईन याने त्याच्या हातातील चाकू फिर्यादीचे पायावर मारून जखमी केले.
त्यावेळी अमजद शेख याने फिर्यादीस शिवीगाळ करून लाथाबुक्कयांनी मारहाण केली. त्यावेळी इरफान शेख व आशपाक मुलाणी यांनी सोडवा सोडव केली. जाताना धमकी देवून निघून गेले. पायातून रक्तस्त्राव होत असल्याने उपचार घेवून फिर्याद दिली