बार्शी : कर्मवीर हाऊसिंग सोसायटी, बार्शी येथील रहिवासी श्रीमती शशिकला श्रीधरराव पाटील (वय ९०) वर्षे यांचे वृद्धापकाळाने आज सायंकाळी निधन झाले. अश्विनी रुरल कॅन्सर सोसायटी बार्शीच्या त्या सदस्या होत्या.
त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून रात्री साडेनऊ वाजता निघेल. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य, श्री शिवाजी महाविद्यालयाचे पहिले रजिस्ट्रार, अश्विनी कॅन्सर रिसर्च सोसायटीचे संस्थापक सदस्य, बार्शी नगरपालिका शिक्षण मंडळाचे सदस्य श्रीधरराव शामराव डुरे पाटील (इर्लेकर) यांच्या त्या धर्मपत्नी होत.
