बार्शी : दि. ७ मे २०२२ पासून सुरु होत असलेल्या श्री भगवंत महोत्सवाची पूर्वतयारी सुरु झाली आहे. याकरिता वृक्ष संवर्धन समिती, बार्शी आणि जय भगवंत ढोल ताशा पथक या संस्थांनी आज श्री भगवंत मंदिर व परिसर स्वच्छतेची मोहिम सेवाभावी वृत्तीने राबविली.

आज पहाटे ६ वाजल्यापासून ते सकाळी १० वाजेपर्यंत या मोहिमेअंतर्गत स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत लहान मुलांपासून ते महिला, युवक, जेष्ठ व्यक्ति अशा सुमारे ६५ लोकांनी सहभाग घेऊन, मंदिर व परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या वाहनाच्या मदतीने मंदिर व परिसर स्वच्छ धुवून काढण्यात आला.


मंदिर स्वच्छतेची संधी दिल्याबद्दल दोन्ही संस्थांनी, श्री भगवंत देवस्थानाचे आणि अग्निशमन दलाचे वाहन उपलब्ध करुन दिल्याबद्दल आ. राजेंद्र राऊत यांचे, तसेच याकामी विशेष सहकार्य केल्याबद्दल संजयआबा बारबोले आणि धैर्यशिल पाटिल यांचे आभार व्यक्त केले आहेत.