धक्कादायक: देशातील कोरोना बाधितांची संख्या 15 लाखांच्या पुढे; 24 तासांत 48,513 नवे रुग्ण, 768 मृत्यू

0
351

ग्लोबल न्यूज – मागील 24 तासांत देशभरात 48,513 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत तर 768 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या पंधरा लाखांच्या पुढे गेली असून ती आता 15,31,669 इतकी झाली आहे.

देशातील एकूण 15,31,669 कोरोना बाधित रुग्णांपैकी सध्या 5,09,447 सक्रिय रुग्ण आहेत तर तब्बल 9,88,029 रुग्णांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. मागील 24 तासांत देशात 35,286 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यासह देशातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 64.24 टक्के एवढा झाला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

देशात मागील 24 तासांत 768 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण मृतांची संख्या 34,193 झाली आहे. देशातील मृत्यू दर कमी झाला असून तो 2.25 टक्के आहे.

आजवर देशात 1,77,43,740 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 4,08,855 चाचण्या या मंगळवारी (दि.28) रोजी करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर जूनच्या मध्यावर 53 टक्के होता तो आज 64 टक्क्यांहून अधिक झाला आहे. जूनच्या मध्यावर 3.33 टक्के असलेला हा मृत्यदर आज 2.25 टक्के इतका झाला आहे. जागतिक स्तरावर सर्वात कमी मृत्युदर असणाऱ्या देशांमध्ये असलेले स्थान भारताने कायम राहिले आहे.

प्रतिबंधात्मक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण, अधिकाधिक कोविड चाचण्या, सर्वांगीण वैद्यकीय उपचार सेवेवर आधारित वैद्यकीय व्यवस्थापन नियमावली, रुग्णालय यंत्रणांवरचा ताण कमी करण्यासाठी लक्षणविरहीत रुग्णांसाठी वैद्यकीय देखरेखेखाली गृह अलगीकरण या सर्वांचा सकारात्मक परिणाम म्हणून मृत्युदर सतत कमी होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here