धक्कादायक:बार्शी तालुक्यात ४७ रुग्णांची वाढ; वाचा सविस्तर कोणत्या गावात किती रुग्ण,एकूण आकडा 1200 च्या पुढे
बार्शी : शहर व तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग फार मोठ्या प्रमाणात पसरत असुन गेली काही दिवसांपासुन कोरोनाबाधित रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवार दि. ७ ऑगस्ट रोजी आलेल्या अहवाला ४३ बाधित रुग्ण वाढले आहेत.


बार्शी तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या अतिशय वेगाने वाढत असुन शहरासह तालुक्यातील अनेक भागावर कोरोना विषाणू पसरत आहे. प्रशासनाच्या पुढे कोरोनाला रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. आज आलेल्या अहवालात बार्शी तालुक्यात ३०५ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत . यात शहरातील १७२ प्राप्त अहवालात १६ रुग्ण कोरोनाने बाधित मिळाले आहे ते शहरातील तेलगिरणीचौक १, पाटील प्लॉट १, एकविराई मंदीर २, सुतारनेट १, जावळी प्लाट १, अलिपुर रोड २, टाकणखार रोड १, ऐनापुर मारुती रोड १, कसबा पेठ १,झाडबुके मैदान १, सुश्रुत हॉस्पीटल १, रोडगा रस्ता १, बारंगुळे प्लॉट १, बार्शी १ असे १६ रुग्ण शहरात सापडले .

तर ग्रामिण मध्ये १३३ प्राप्त अहवाला पैकी १०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे ग्रामिण मध्ये सर्वाधिक रॅपीड टेस्टमधून घारी येथे १२ पॉझीटीव्ह सापडल्याने खळबळ उडाली आहे तर वैराग ३, खामगाव ५, पानगाव १, कव्हे १, दहिटणे १, भालगाव १, पांगरी १, मळेगाव १, उंबरगे १, साकत १, चिखर्डे १ पॉझिटिव्ह आढळल्याने एकूण संख्या ४३ कोरोना बाधित वाढल्याने आता कोरोना बाधितांचा आकडा १२०४ वर पोहचला आहे .७४३ रुग्ण बरे झाले आहे तर ४१७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत