धक्कादायक: बार्शी तालुक्यात कोरोनाने केली हजारी पार; रविवारी 43 रूग्णांची वाढ,पाच मृत्यू
बार्शी तालुक्यात आज ४३ ने वाढ तर एका दिवसात ५ मयत ; एकूण रुग्णसंख्या १०१० तर आतापर्यंत ३८ मृत्यू
गणेश भोळे
बार्शी : बार्शी तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ होत असुन रविवारी दि २ ऑगस्ट रोजी आलेल्या ४३ ने वाढ झाली असून त्यामधील ३५ रुग्ण हे बार्शी शहरामधील आहेत तर ग्रामिणमध्ये ८ रुग्ण आढळले आहेत त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १०१० वर पोहचली आहे. तर दिवसभरात ५ बाधित रुग्ण दगावले आहे .

बार्शी तालुक्यात कोरानाचा वाढता प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे बाधित रुग्णांचा संख्या काही केल्या कमी होत नाही त्यामुळे बार्शी शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे .अनेक कुटुंबच्या कुटुंब या कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. लॉकडाऊनच्या काळातही झपाट्याने बाधित रुग्ण वाढले आहे मात्र आता लाकडाऊन संपल्याने पुन्हा एकदा बार्शी शहरात आज खेरीदी विक्री करणाऱ्यांची गर्दी पहायला मिळाली .


आज आलेल्या २१५ अहवाला पैकी ४३ रुग्ण कोरोना बाधित सापडले आहेत तर १७२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत .

तर ४३ पॉझिटिव्ह पैकी बार्शी शहरातील बेदराई गल्लीत ४, खानापुर रोड २, लहुजी चौक १ ,झाडबुके मैदान २, चव्हाण प्लॉट २, नागणे प्लॉट २ ,आझाद चौक १, बुरुड गल्ली १ ,गवळी गल्ली २ ,
आडवा रस्ता १, पराग इस्टेट १,
रामभाऊ पवारचौक २, भीमनगर ३, सावळे चाळ २, पाटील चाळ १, शिवाजीनगर ३ ,नाईकवाडी प्लॉट १, एकता कॉलनी १, परांडा रोड १, आदर्शनगर २ हांडेगल्ली १ असे ३५ रु ग्णांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे .

तर ग्रामिण मध्ये वैराग ३ हत्तीज १ चिंचोली १ ,भालगाव १, तांबेवाडी १ ,पांगरी १ असे ८ रुग्णांचा रिपोर्ट पॉझीटिव्ह आला आहे. तर आज दिवसभरात ५ बाधित रुग्ण मयत झाल्याने आतापर्यंत मृताचा आकडा ३८ वर पोहचला आहे.
मात्र जमेची बाजू अशी की रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाणही वाढत असुन आतापर्यत ५०३ रुग्णाना डिचार्ज देण्यात आला आहे तर ४६९ रुग्णावर उपचार सुरु आहेत. सध्या बार्शी शहरात १३८ कंन्टेनमेंट झोन आहे . तर ग्रामिण मध्ये ५५ कंन्टेनमेंट झोन असे तालुक्यात १९३ कंन्टेनमेंट झोन आहेत