उद्धव ठाकरेंना धक्का:शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड शिंदे गटात सहभागी
उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड हे शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाले असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांची शिष्टाई यावेळी कामी आली असून यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे.

तुमचा योग्य तो मान-सन्मान राखला जाईल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.आपण पक्षाचे कार्य करत रहा आपणास नक्कीच सन्मान पूर्वक वागणूक मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.यावेळी खा प्रताप जाधव, खा श्रीरंग बारणे,आ संजय शिरसाट,आ ज्ञानराज चौगुले,अजित पिंगळे आदी उपस्थित होते.
यापूर्वी आमदार चौगुले यांचे सूचक वक्तव्य –

मी माझे राजकीय गुरु रवींद्र गायकवाड, गटनेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुवाहटी येथे आलो आहे.मी कोणाच्याही दबावाला बळी न पडता आलोय असे आमदार चौगुले यांनी सांगितले होते त्यावेळी चौगुले यांना शिंदे गटात पाठवण्यात गायकवाड यांचा हात व संमती असल्याचे बोलले जात होते आता त्याला पुष्टी मिळाली आहे.
माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी 1988 पासून शिवसेना काम सुरू केले त्यानंतर ते उप जिल्हा प्रमुख होते.1995 शिवसेनाकडून आमदार होत निवडणूक जिंकली.1995 ला निवडणूक प्रचारसाठी त्यांनी मराठवाडा भागात बाळासाहेब ठाकरे यांना उमरगा येथे आणून प्रचार सभा घेतली.
2009 ला उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत डॉ पदमसिह पाटील यांचेकडून अवघ्या 5 हजार मताने पराभव झाला त्यानंतर 2014 ला 2 लाख 15 हजार पेक्षा अधिक मतांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला.