पेंग्विनच्या अंडयातून बाहेर आलेला कोण आहे वरून सरदेसाई – अमेय खोपकर
ग्लोबल न्यूज: मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी लगावलेल्या आरोपानंतर युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी आपल्या वकिलामार्फत देशपांडे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे या नोटिसला उत्तर देताना आम्ही असल्या नोटिसांना भीत नाही असे ट्विट देशपांडे यांनी केले होते.आता यावर महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत सरदेसाई यांच्या वर टीका केली आहे.


पेंग्विनच्या अंड्यातून आत्ता कुठे बाहेर आलेला कोण आहे हा वरुण सरदेसाई? हा कोण आम्हाला माफी मागायला सांगणार? अशी टीका अमेय खोपकर यांनी ट्विटरवरून केली आहे. त्यामुळे भविष्यात मनसे आणि सेना यांच्यातील वाद वाढलेले दिसून येणार आहे.
महापालिकेचा ‘वरुण’ गोंधळ आतून तमाशा सुरु आहे. आम्ही मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांचा पर्दाफाश करणारच”, असा घणाघाती टीका अमेय खोपकर यांनी केली याशिवाय “संदीप देशपांडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर 24 तासात स्पष्टीकरण द्या, असं आव्हान देतो. स्पष्टीकरण द्यायची हिंमत आहे का?”, असा सवाल अमेय खोपकर यांनी केला आहे.