शिवभोजन थाळी पुढील तीन महिने पाच रुपयांनाच मिळणार; जाणून घ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
लॉकडाऊन झाल्यापासून राज्यात सुरू झालेली शिवभोजन थाळी ही पाच रुपयांना दिली जात होती. ती पुढील तीन महिने पाच रुपयांनाच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याशिवाय अन्य महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय संक्षिप्तपणे खालीलप्रमाणे…
१) मुंबई उपनगरातील जुहू बिचवरील खाद्य–पेये विक्रेते को–ऑप. सोसायटी लि. यांना भाडेपट्ट्याने मंजूर केलेल्या जमिनीच्या भुईभाड्याच्या दराबाबत निर्णय घेण्यात आला.
२) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ कलम २६, १४८–अ मध्ये सुधारणा अध्यादेश प्रख्यापित करण्यास मान्यता देण्यात आली.
३) जल जीवन मिशन.

४) राज्यातील लॉकडाऊन परिस्थितीत निर्माण झालेल्या अतिरिक्त दुधाच्या नियोजनाच्या योजनेस मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला.
५) कौशल्य विकास व उद्योजकता विभागाला आता “कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग” असे नाव देण्याचा निर्णय.
६) आयडीबीआय बँक, महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँक या शासकीय मालकीच्या बँकांना तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास मंजुरी.
७) शिवभोजन थाळीचा दर पुढील ३ महिन्यांसाठी ५ रुपये एवढा ठेवणे.
८) एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्यास मंजुरी.
९) मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम टप्पा–२ राज्यात राबवण्याला मंजुरी.