पाच दहा नव्हे तर शिवसेनेचे 29 आमदार फुटले, वाचा कोण आहेत ते आमदार यादीत?
एकनाथ शिंदेंकडून शिवसेना हायजॅक
रात्री उशीरा शिवसेनेने आमदारांची बैठक बोलावली होती. त्याच बैठकीला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि 29 आमदार गैरहजर होते. या सर्व आमदारांना आणि एकनाथ शिंदे यांना पक्षाकडून सातत्याने संपर्क केला जातोय. मात्र, सर्वांचेच फोन नॉट रिचेबल आहेत. यामुळेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. शिवसेनेनी खासदारांना देखील मुंबईमध्ये दाखल होण्याच्या सूचना दिल्यायेत.

मुंबई : विधानपरिषद निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मते फोडण्यात भाजपला यश मिळाले. मात्र, त्यानंतर राज्यातील राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे तब्बल 29 आमदार फुटले आहेत. एकनाथ शिंदेंनी शिवसेनाच हायजॅक केलीये. गेल्या काही तासांपासून शिंदे हे नॉट रिचेबल आहेत. यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात कमालीची अस्वस्थता पाहिला मिळते. रात्री उशीरा शिवसेनेने आमदारांची बैठक बोलावली होती. त्याच बैठकीला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि 29 आमदार गैरहजर होते. या सर्व आमदारांना आणि एकनाथ शिंदे यांना पक्षाकडून सातत्याने संपर्क केला जातोय. मात्र, सर्वांचेच फोन नॉट रिचेबल आहेत. यामुळेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले. शिवसेनेनी खासदारांना देखील मुंबईमध्ये (Mumbai) दाखल होण्याच्या सूचना दिल्यायेत.
वाचा नॉट रिचेबल असलेल्या आमदारांची नावे-
- एकनाथ शिंदे
- शंभूराज देसाई
- अब्दुल सत्तार
- संदीपान भुमरे
- भरत गोगावले
- महेंद्र दळवी
- संजय शिरसाठ
- विश्वनाथ भोईर
- बालाजी केणीकर
- किमा दाबा पाटील
- तानाजी सावंत
- महेश शिंदे
- थोरवे
- शहाजी पाटील
- प्रकाश आबिटकर
- अनिल बाबर
- किशोर अप्पा पाटील
- संजय रायमुलकर
- संजय गायकवाड
- शांताराम मोरे
- लता सोनवणे
- श्रीनिवास वणगा
- प्रकाश सुर्वे
- ज्ञानेश्वर चौगुले
- प्रताप सरनाईक
- यामिनी जाधव