शिवसेना की शिंदे सेना अखेर सोपल गटाने भूमिका केली जाहीर

0
191

शिवसेना की शिंदे सेना अखेर सोपल गटाने भूमिका केली जाहीर
माजी मंत्री दिलीप सोपल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत
अक्कलकोटे यांनी जाहीर केली सोलापुरात भूमिका

बार्शी: शिवसेनेचे तत्कालीन नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामोर होत आहेत. या पार्श्वभूमीवर बार्शीतील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप सोपल शिवसेनेत थांबणार की शिंदे गटा सोबत जाणार याबाबत उत्सुकता होती. अखेर सोलापूर येथे झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत दिलीप सोपल हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच शिवसेनेत राहणार असल्याची भूमिका त्यांच्या वतीने बार्शी नगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोट यांनी स्पष्ट केली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाप्रमुख गणेश वानकर, शिवसेनेचे स्थानिक नेते भाऊसाहेब आंधळकर,शिवसेना शहरप्रमुख दीपक आंधळकर, नागेश अक्कलकोटे, माजी नगरसेवक बापू जाधवमाजी उपनगराध्यक्ष संदीप बारंगुळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आंधळकर पिता पुत्रांनी देखील आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम असून कोणी कितीही फुटून गेले तरी आपण आपली भूमिका बदलनार नसल्याचे या बैठकीत ठामपणे सांगितले. आगामी काळात बार्शी शिवसेनेचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वासही यावेळी भाऊसाहेब आंधळकर यांनी व्यक्त केला.अक्कलकोटे यांनी जाहीर केलेल्या या भूमिकेमुळे सोपल नेमके कुठे हा संभ्रम आता दूर झाला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here