सेल्फी विथ सीटबेल्ट, सेल्फी विथ ड्रायव्हर

0
47

selfiewithseatbelt

selfiewithdriver

सेल्फी विथ सीटबेल्ट, सेल्फी विथ ड्रायव्हर

नूकतेच देशातील प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रोड अपघात झाला. त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण उद्योग क्षेत्र हादरले आहे. मर्सिडिस चे टॉप मॉडेल सर्व सुरक्षा साधने असलेली गाडी होती. तरीही किरकोळ चूक आपल्या देशाच्या मोठ्या उद्योजकाला गमावून बसली आहे.

या घटनेचे दखल घेत आधीच वाहतुकीचे कडक असलेले नियम केंद्र सरकार अजून कडक करण्याच्या विचारात आहे. या पुढे मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तींनाही सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाताने हा विषय ज्वलंत बनला आहे. आपल्या देशात रोज हजारो लोक रोड अपघातात आपला जीव गमावतात किंवा कायमचे अपंगत्व येते. यासाठीच मागील काही वर्षांत वाहतुकीचे नियम मोडल्या नंतर असलेली किरकोळ दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. त्यात हेल्मेट, सीटबेल्ट, स्पीड लिमिट, ड्रिंक अँड ड्राईव्ह यासह इतर सर्वच प्रकारचे वाहतुकीचे नियम मोडल्या नंतरच्या दंडात मोठी वाढ केली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

दंडात्मक कारवाई करून त्यातून महसूल मिळवणे हा उद्देश नसून वाहतुकीचे नियम पळून अपघात टाळून सुरक्षित प्रवास करून स्वतःची व इतरांच्या जीवाची हानी टाळणे हा त्याचा उद्देश आहे.

आज देश सुशिक्षित आहे. निदान चारचाकी वाहने चालवणारे तरी सर्व सुशिक्षित आहेत त्या सर्वांनी हे नियम का बनवलेत याचा विचार केला पाहिजे. सरकार पुढील 2-3 दिवसात चारचाकी गाडीत मागच्या सीटवर बसलेल्यानाही सीटबेल्ट बंधनकारक करेल. त्यासाठी दंड ही वसूल केला जाईल. अनेक कायदे आणि नियम असलेल्या या देशात आजून एक कायदा नियम तयार होईल. पण अपघात कमी होतील का ? अपघातातील मृत्यू कमी होतील का ? हे नक्की कोणी सांगू शकत नाही. त्यासाठी आपल्यातील प्रत्येका मध्ये जगृती होणे आवश्यक आहे.

आज आपला देश झपाट्याने बदलतोय. रोड इन्फ्रास्ट्रक्चर खूप वेगाने वाढतेय. दोन ठिकानातील, शहरातील, राज्यातील पोहोचण्यासाठी लागणारी वेळ कमी झाली आहे. म्हणजेच प्रवासाचा वेग वाढला आहे. हा वाढलेला वेग प्रगतीचा आहे, परिवर्तनाचा आहे, संपत्तीचा आहे पण कधीकधी व काही दुर्दैवी लोकांच्या बाबतीत हाच वाढलेला वेग मृत्यूचा ठरत आहे.

त्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांची लिस्ट खूप मोठी आहे. त्यासाठी शासनाने टीव्ही, रेडिओ, सोशल मीडिया वरून नव्याने माहितीपर कार्यक्रम घेऊन जनजागृती करावी. आज वाढलेली वाहनांची संख्या, गाड्यांचा स्पीड, कानावर येणाऱ्या अशा घटना हे पाहून कोणी चारचाकी वाहन घेऊन गेले, प्रवासाला गेले तरी युद्ध भूमीवर गेल्या प्रमाणे, घरी आपली काळजी करणारे असतात.

गाडीचा वेग वाढला आहे, रस्ते चांगले आहेत. त्यामुळे अनेक लोक आपल्या कामाचा दौरा अगदी घडाळ्याच्या काट्यावर सेट करतात. त्याचा ताण प्रवासात येतो. ट्राफिक किंवा इतर अडचणीत वेळ गेला की मग चालकाला गाडी सुसाट ओढायला लावतात. पण चालक हा ही मनुष्यच आहे मशीन नाही. त्याच्या क्षमतेच्या बाहेर जान म्हणजे त्याच्या आणि स्वतःच्या जीवाशी खेळण्या सारखे आहे.

महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचे सारथ्य केले होते. सारथी म्हणजेच आधुनिक काळातील चालक. सारथी श्रीकृष्णा सारखा असला की महाभारत ही जिंकता येते आणि आजच्या काळातील आयुष्य ही जिंकता येते इतके मोठे महत्व सारथी चे आहे. म्हणूनच आपला चालक जो आपल्याकडे पगारावर तर कधी बदली चालक म्हणून काम करतो त्यांच्यावर गाडी चालवताना अधिक ताण येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ठराविक वेळा नंतर त्याला विश्रांती देने आवश्यक आहे. वर्षातून किमान एकदा त्याची आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तो चालक म्हणजे एक कामगार नसून महाभारतातील श्रीकृष्णा प्रमाणे सारथी आणि साथी आहे हे ओळखून त्याला सन्मानाने वागणूक दिली पाहिजे. यातून तो तणावमुक्त होऊन गाडी चलवेल.

या पुढे आपण स्वतःहून जागृक राहू, इतरांना जागे करू जे लोक स्वतः ड्राइव्हिंग करतात त्यांनी #selfiewithseatbelt हा ट्रेन्ड चालवू. तुमचे पाहून तुमचेच मित्र, नातेवाईक यांच्यातही जनजगृती होईल.

तर जे लोकांकडे चालक आहेत त्यांनी #selfiewithseatbelt व

selfiewithdriver

हा ट्रेन्ड चालवू आणि जनजागृती करू.

एच. सुदर्शन, बार्शी

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here