स्व. दादासाहेब माने प्रतिष्ठाणच्या शिबीरात ११६ रक्त बाटल्यांचे संकलन
स्व. दादासाहेब माने प्रतिष्ठाणच्या शिबीरात ११६ रक्त बाटल्यांचे संकलन
बार्शी – शहरातील स्व. दादासाहेब माने प्रतिष्ठाण आयोजित २३ वा गणेशोत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात ११६ रक्त बाटल्यांचे संकलन झाले. प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव काळात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते श्रीगणेशाची आरती करुन शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी, प्रतिष्ठानचे प्रमुख प्रकाश माने आणि बंडू कांबळे यांच्या हस्ते आमदार राऊत यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.


आमदार राऊत यांनी प्रतिष्ठानच्या विधायक उपक्रमाचे कौतुक करताना सध्या रक्तदान शिबीरांची खरी गरज असल्याचे म्हटले. यावेळी,माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, अरुण नागणे, माजी नगरसेवक विलास रेणके, अमोल चव्हाण, पाचु उघडे, विजय चव्हाण यांचाही सन्मान करण्यात आला. कोविड महामारीच्या दोन वर्षानंतर यंदा सार्वजनिक उत्सव साजरा होत आहे. त्यातच, सामाजिक आणि विधायक उपक्रम, देखावेही होत आहेत. स्व. दादासाहेब माने प्रतिष्ठाण आयोजित रक्तदान शिबीरात ११६ जणांनी सहभाग नोंदवत मंडळाशी रक्ताचं नातं जोडलं. यावेळी, रक्तदान शिबिरस्थळी वाजणाऱ्या रणगंधर्व ढोल-ताशा पथकाच्या कलाकारीने अनेकांचे लक्ष वेधले होते. दरम्यान, या शिबिराला बार्शीतील मान्यवर, प्रतिष्ठीत व्यापाऱ्यांनीही भेट दिली.
प्रतिष्ठानच्यावतीने विसर्जनाच्याअगोदर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रशांत माने यांनी दिली. शिबीर यशस्वीतेसाठी सागर माने, सौरभ माने, नितीन मेहेर, रोहिदास कांबळे, पवन वायकुळे, आशिष कानडे, कल्पक यादव, आकाश सुकुंडे, आशिष तौर, अंकुश बंदीचोडे, अजय पोफळगट,रोहन जाधव, रोहित माने, प्रतीक श्रीखंडे आणि प्रतिष्ठाणच्या सर्वच सदस्यांनी परिश्रम घेतले.