उस्मानाबाद जनता बँकेच्या तज्ञ संचालक पदी सीए विजय गपाट यांची निवड
बार्शी : येथील युवा चार्टड अकाऊंट विजय एन.गपाट यांची उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या तज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली आहे.


नुकतीच बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली त्यात वसंतराव नागदे आणि ब्रिजलाल मोदानी यांच्या पॅनल ची सत्ता आली आहे. नागदे यांची चेअरमन पदी तर वैजिनाथ शिंदे यांची व्हॉईस चेअरमन पदी निवड झाली आहे. बँकेच्या महाराष्ट्रात २८ शाखा व कर्नाटक राज्यात २ शाखा अशा एकूण ३० शाखा कार्यरत आहेत. बँकेने कोअर बँकिंग सोल्युशनचा अवलंब केला असून बँकेने स्वत:च्या जागेत स्वत:चे डेटा सेंटर उस्मानाबाद येथे व बीआर साईट उदगीर येथे स्वत:च्या जागेत अद्यावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण असे कार्यरत आहे.
नूतन संचालक मंडळाने सीए विजय गपाट यांना पाच वर्षांसाठी तज्ञ संचालक म्हणून काम करावे अशी विनंती केली होती. त्यानुसार गपाट यांनी त्यास संमती दिल्याने ही नियुक्ती करण्यात आली आहे.गपाट यांचे बार्शी व पुणे येथे कार्यालय आहे. ते आडत व्यापारी नवनाथ गपाट यांचे चिरंजीव आहेत.त्यांच्या निवडीबद्दल सर्व थरातून अभिनंदन होत आहे.