दहा हजार रूपये किंमतीची देशी दारू जवळ बाळगल्याप्रकरणी नारी ता.बार्शी येथील दोघांवर पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजीत सुरेश कापसे वय 26 वर्षे व बालाजी बापू डिडवळ वय 34 वर्षे दोघेही रा.नारी ता.बार्शी अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.
उमेश कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सहा.पो.नि.सुधीर तोरडमल यांचे आदेशान्वये पांडुरंग मुंढे, चेतन झाडे, जालींधर देवकर असे सर्वजन मिळुन नारी हद्दीत अवैध धंदयावर केसेस करण्याचे अनुशंगाने पेट्रोलींग करीत असताना नारी गावात आले असता बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, सुरेश भिमराज कापसे रा.नारी ता.बार्शी याचे राहते घराशेजारी असनारे पत्राशेडमध्ये लाईटच्या उजेडात एक इसम चोरून दारू विक्री करित आहे.
पोलिसांनी जाऊन पाहिले असता एक पुरूष आपले समोर पुटयाचे छापडी बाँक्स घेऊन बसलेला दिसला. आरोपी अभिजीत कापसे यास वरील मिळुण आलेल्या प्रोव्ही माला बाबत विचारना केली असता त्याने सदरची दारू बालाजी डिडवळ यांनी विक्री करीता आनलेली असुन सदरची दारू विक्री करणे करीता मी त्याचे कडे कामास असले बाबत सांगितले.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

याबाबत पांगरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पांडुरंग मुंढे हे करत आहेत.