लॉकडाऊन करून चालणार नाही कोरोना रुग्नांना शोध घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
काही गोष्टीत शिथिलता देऊन पुन्हा ३१ ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. मात्र लॉकडाऊन वाढवून काही होणार नाही कोरोना रुग्नाचा शोध घेणे सुद्धा महत्वाचे आहे. आज मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी लॉकडाऊन वाढवण्याबाबत घोषणा करताना काही सूचना सुद्धा दिल्या आहेत.


मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेत. कोरोनाच्या संदर्भातील परिस्थितीबाबत चर्चा झाली. कोरोना रुग्णांचा शोध, त्यांचे सपर्क व त्यांना वेळीच विलगीकरण सुविधेमध्ये दाखल करणे, योग्य ते उपचार तात्काळ सुरू करणे आवश्यक आहे. सर्व पालिकांनी या दृष्टीने अतिशय काटेकोरपणे कार्यवाही करावी असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.
तसेच, 1 सप्टेंबरनंतर पीपीई कीट आणि मास्कचा पुरवठा बंद करण्याचे केंद्रांने सांगितले आहे. मात्र, पुढील काळात देखील सुरु ठेवावा अशी विनंती आपण पंतप्रधानांना केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.