सारोळे: महिला दिनाच्या कार्यक्रमावरून तलवारीने हाणामारी: दोघांवर जमावाचा प्राणघातक हल्ला;21 जणांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी :सारोळे ता. बार्शी येथे महिला दिनाच्या कार्यक्रमानीम्मीत ग्रामपंचायतकडे जाताना महिलांना शिवीगाळ करत दोघांवर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. ही घटना 08/03/2021 रोजी घडली..ग्रामपंचायतीचा सरपंच विरोधकांचा असल्याने त्यांनी जमावाने हल्ला करत महिलांना शिवीगाळ केली.


त्यावेळी विठ्ठल उत्तम गाटे यांनी जाब विचारला असता सुधाकर बजीरंग जाधव संतराम महादेव जाधव , परमेश्वर लक्ष्मण भगत यांनी तलवारीने व इतर दत्तात्रय संतराम मोरे कुमार मोरे नाना मोरे प्रदीप जाधव सागर मोरे संजय मोरे दीपक मोरे सुरजमोरे ज्ञानेश्वर चौधरी लक्ष्मण नकाते(सरपंच)विद्यासागर कुलकर्णी उदय कोंढारे चंद्रकांत जाधव दिगंबर भोसले सागर पाटील प्रशांत मोरे पप्पू मोरे रोहन शिंदे यांनी लोखंडी पाईप व सळईने मारहाण केली.
यातील सुधाकर जाधव याने एकेकाला ख्लास करीन म्हणत नंगि तलवार महिलांवर चालवण्याच प्रयत्न केला. जमावाने केलेल्या हल्ल्यामध्ये किशोर नानासाहेब गाटे अशोक गोविंद गाटे बिभिषन साधू गाटे है जखमी झाले. या प्रकरणी जाधव मोरे गटाच्या 21 गुन्हावर नोंद झाला आहे..