सोलापूर : दैनिक ‘पुढारी’ सोलापूर आवृत्तीचे वृत्तसंपादक म्हणून संजय पाठक यांनी मंगळवार दि. १२ एप्रिल २०२२ रोजी सूत्रे हाती घेतली.
पाठक यांच्या पत्रकारितेची कारकीर्द सोलापूर येथील दैनिक तरुण भारत, संचार, लोकमत या वृत्तपत्रातून सुरु झाली. ‘सकाळ’ मिडीया ग्रुपमध्ये त्यांनी मुख्य उपसंपादक पदावर काम पाहिले. सकाळमध्ये गेली २२ वर्षे ते कार्यरत होते.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

‘सुखद काही’ व ‘टिक्कोजीरावांचे फेटे आणि फटकारे’ ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सोलापूर आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या ‘मंथन’ या कौटुंबिक श्रुतिका मालेचे लेखनही ते करत असतात.