Home Blog

बार्शी तालुक्यात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आडवला ताफा

0

बार्शी तालुक्यात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आडवला ताफा

बार्शी(प्रतिनिधी) अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पिकविम्याची अग्रीम रक्कम मिळण्यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली बार्शी-लातूर या महामार्गावरील बार्शी तालुक्यातील पांगरी येथील बस स्थानक चौकात शेतकरी रस्त्यावर उतरलेले होते. त्यावेळी महाराष्ट्र शासनातील मंत्री तानाजी सावंत यांचा ताफा त्या मार्गावरून पुढे जाणार होता परंतु आंदोलनामुळे हा ताफा अडकून पडला होता.

त्यामुळे मंत्री तानाजी सावंत गाडीखाली उतरून आंदोलनामध्ये आले व त्या ठिकाणी पंधरा दिवसाच्या आत अतिवृष्टीतून वगळलेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल असे आश्वासन दिल्यानंतरच शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करून पंधरा दिवसाच्या आत मागण्यांची पूर्तता न झाल्यास संबंधित मंत्र्याच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला.

त्यावेळी धनंजय तौर, सुहास देशमुख, सुनील गाढवे, सुरज पोकळे, भगवान खबाले, अनिल शिंदे, बाळासाहेब जगताप, बाबासाहेब जाधवर, डॉ.अरुण नारकर, रामभाऊ देशमुख, नानाप्पा मुंढे, सागर गोडसे, दादा गोडसे, बाबू काझी, गणेश काळे, किरण मुळे, शहाजहान बागवान, सौरभ यादव, बालाजी यादव, संतोष चव्हाण, बाबा जाधव, औदुंबर पाटील, शिवाजी गोडसे, सुनील खवले आदींसह हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.

सुमारे एक तास हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन मंत्री तानाजी सावंत व बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखाने यांनी स्वीकारले तर या आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त पांगरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेवला होता.

बार्शी तालुक्यात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आडवला ताफा. मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पंधरा दिवसात वगळलेल्या सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई व अग्रीम पिकविमा न दिल्यास संबंधित मंत्र्याच्या घरासमोर आंदोलन करणार.

शंकर गायकवाड

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शीत एसटी कंडक्टरला मारहाण; दोघा मद्यपींवर गुन्हा

0

बार्शीत एसटी कंडक्टरला मारहाण; दोघा मद्यपींवर गुन्हा

बार्शी : शहरातील बसस्थानक चौकातून एसटी स्थानकात जात असताना दोघाजणांनी वाहकास दमदाटी व शिवीगाळ केली. बसस्थानकात येऊन मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दादा कातुरे, कन्हैय्या पाटील (दोघे रा. उपळाई रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

वाहक भुजंग ठोंबरे (रा. ढेकरी, ता. तुळजापूर) यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी पावणेआठच्या दरम्यान घडली. बार्शी-माढा बस (क्रमांक एमएच ४५ बीटी ०९७०) चालक मारुती दराडे यांच्यासह बसस्थानकात येत असताना दोघे मद्यप्राशन करुन चौकात आडवे येत होते. त्यांना बाजूला व्हा, गाडीला वाट द्या असे चालकाने म्हटले.

त्यानंतर त्या दोघांनी चालकास शिविगाळ केली. बसस्थानकात एसटी आल्यानंतर तेथे येऊन दोघांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार करीत आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

विनयभंग प्रकरण – मलकापूरचे एकनाथ लोमटे महाराज यांना 45 दिवसानंतर अटक

0

विनयभंग प्रकरण – मलकापूरचे एकनाथ लोमटे महाराज यांना 45 दिवसानंतर अटक

 उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

राज्यभर प्रसिद्ध असणारे येरमाळा जवळील मलकापूरचे स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांच्यावर विनयभंगचा गुन्हा 28 जुलै 2022 रोजी दाखल करण्यात आला होता त्यांना कळंब पोलिसांनी 45 दिवसानंतर अटक केली आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून लोमटे महाराज हे फरार होते.

महाराजांच्या दर्शनासाठी मठात आलेल्या महिलेचा विनयभंग झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. 28 जुलै रोजी सदर महिला मठात दर्शनासाठी आली असता महाराजांनी तिचा विनयभंग केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसेच मागील वेळी तू दर्शनासाठी आली होती तेव्हा तुझ्यावर बलात्कार केला होता. त्याची व्हिडिओ क्लिपही (Video Clip) माझ्याकडे असल्याची धमकी महाराजांनी दिली. तसेच ही क्लिप व्हायरल होऊ द्यायची नसेल तर तुला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील, अशी धमकी दिली. सदर प्रकाराला महिलेने तीव्र विरोध केला असता महाराजांनी तिच्या अंगावर हात टाकत शिवीगाळही केल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. यावेळी आरडाओरड केल्यानंतर शिष्यांची गर्दी जमा झाली, त्यानंतर महाराजांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ लोमटे महाराजांविरोधात याआधीदेखील फसवणुकीच्या तक्रारी आल्याची माहिती समोर आली आहे.

महिलेची तक्रार काय?

सदर प्रकरणी महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, ती 28 जुलै रोजी दुपारच्या वेळी एकनाथ सुभाष लोमटे महाराजांच्या दर्शनासाठी मलकापूर येथील मठात गेली होती. तेथे भक्तांच्या जेवणाचा कार्यक्रम सुरु होता. त्यामुळे ती इमारतीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाखाली बसली. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास महाराजाचा शिष्य अशोक याने सांगितले, महाराज समोरच्या रुममध्ये बसले आहेत. तुम्हाला आत बोलावलं आहे. रुममध्ये गेल्यावर , तिथे महाराज एकटेच होते. त्यावेळी त्यांनी तुला माझ्यासोबत शारीरीक संबंध ठेवावे लागतील, असे म्हटले. तसेच मागील वेळी प्रसादातून तुला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तुझ्यावर बलात्कार केला. त्याचा व्हिडिओ माझ्याकडे असून तो व्हायरल करण्याची धमकीही दिली. याविरोधात आरडाओरडा केल्यानंतर महाराजांनी पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार महिलेने केली.

महाराजांविरोधात गुन्हा

महिलेने आरडाओरडा केल्यानंतर मठात भक्तांची गर्दी जमली. मात्र गर्दीतून महाराजांनी पळ काढला. या प्रकरणी कलम 354,354 अ, 341,323,504 व 506 नुसार येरमाळा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महाराजांविरोधात आधीदेखील अनेक फुसवणुकीच्या तक्रारी आहेत. मात्र राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्याविरोधात फार कारवाया झालेल्या नाहीत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

औसा, बार्शीसह उस्मानाबाद जिल्ह्यातील ४ लाख शेतकरी वंचित

0

औसा, बार्शीसह उस्मानाबाद जिल्ह्यातील ४ लाख शेतकरी वंचित

खा. राजेनिंबाळकर : शासनाने घोषित केलेली मदत मृगजळ

उस्मानाबाद, पुढारी वृत्तसेवा: यंदाच्या हंगामात सततच्या पावसामुळे पिके पाण्याखाली आहेत. त्यामुळे नुकसान झाले आहेच; शिवाय जिथे पीक बऱ्यापैकी तिथे चक्री भुंगा, गोगलगाय, यलो मोझॅक आदींच्या हल्ल्यामुळे मोठे नुकसान आहे. शासनाने जाहीर केलेली मदत मृगजळ असून अजूनही ३ लाख ८४ हजार शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. लोकसभा मतदारसंघातील या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.

मुख्य पीक असलेल्या सोयाबीन या पिकांवर मोठ्या प्रमाणात शंखी गोगलगाय, बोंडअळी, यलोमोझॅक आणि सततच्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीन पिके हे पिवळे पडून विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन सर्व पिके शेतकऱ्यांच्या हाताबाहेर गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर उर्वरित सोयाबीन पिकास खोडमाशी व चक्री भुंगा या किडींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सोयाबीन पिकामध्ये मर होत असून उर्वरित सोयाबीन पीक हे शेतकऱ्यांच्या हातातून केवळ नैसर्गिक आपत्ती व सततच्या पावसामुळे गेले आहे. प्रत्येक महसूल मंडळात

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांसह लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये जुलै ते सप्टेंबर महिन्यांमध्ये सततच पाऊस, शंखी गोगलगाय, यलो मोझॅक व खोडमाशीमुळे शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्वतः पाहणी केली. परिस्थिती आहे. सोयाबीन पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

या दौऱ्यासाठी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, तलाठी यांच्यासही तालुका कृषी विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या पाहणी दौऱ्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असल्याचे सांगितले. वरकरणी सोयाबीन पीक हे हिरवेगार दिसत असले तरी फळधारणा नसल्यामुळे व किडींच्या प्रादुर्भावामुळे हजारो हेक्टरमधील सोयाबीन पीक हे संपूर्णत: वाया गेले त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न हे शून्य आहे. अशी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यातील उर्वरित महसूल मंडळामध्ये तसेच लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा तालुका व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये अशी सर्वांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी खा. राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

प्रेमीयुगलाने केली आत्म हत्या ;  बीबी दारफळ गावातील प्रकार ; चिठ्ठी पोलिसांच्या हाती

0

प्रेमीयुगलाने केली आत्म हत्या ;  बीबी दारफळ गावातील प्रकार ; चिठ्ठी पोलिसांच्या हाती

सोलापूर : आमचं प्रेम समाजाला मान्य नाही अशी चिठ्ठी लिहून प्रेमीयुगलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ या गावात सोमवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली.

बीबीदारफळ येथील गणेश विद्यालयात मागील वर्षीच इयत्ता १२ वी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रांजली भारत सुतार व विवाहित असलेल्या वाजिद चाँद इनामदार यांनी राहत्या घरात एका दोरीने गळफास घेतला.

या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी ७ वाजता सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला मिळाली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह खाली उतरविले त्यानंतर शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी पूर्वी दोघांनीही स्वतंत्र दोन चिठ्ठ्या लिहिल्या आहेत, त्या चिठ्ठ्या पोलिसांच्या हाती लागल्या असून आमचं प्रेम समाजाला मान्य नाही… आमच्या आत्महत्येला कोणासही जबाबदार धरू नये असा मजकूर चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले.(साभार लोकमत)

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सकाळी चहा मिळायचा नाही, लंपीला हलक्यात घेऊ नका; अजित पवारांनी सरकारला सुनावलं

0

सकाळी चहा मिळायचा नाही, लंपीला हलक्यात घेऊ नका; अजित पवारांनी सरकारला सुनावलं

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. देशासह राज्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या रोगाचा फैलाव होत असल्याने धोका वाढला आहे. या रोगाला हलक्यात घेऊ नका, सकाळच्या चहा मिळायचा नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी सरकारला सुनावले.

देशासह राज्यात लिम्पी आजाराचे संक्रमण वाढत आहे. संक्रमित झालेल्या जनांवरांपासून चारा, पाणी दुषित होत असल्याने हा रोग पसरत आहे. साखर कारखाने सुरू होण्याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. कारखाने सुरू झाल्यावर कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात बैल आणि जनावरे कारखाना परिसरात येतात. त्यामुळे रोग मोठ्या प्रमाणात फैलावू शकतो. त्यामुळे सरकारने या रोगाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. याबाबत जनजागृतीचे काम करण्याची गरज आहे. काय खबरदारी घ्यावी, आपल्या पशूधनाचे रक्षण कसे करायची, याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

लंपी आजारात जनावर दगावल्यास विमा भरपाई मिळत नसल्याची माहिती मिळत आहे. जर विमा कवच मिळत नसेल तर सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यात लंपीची समस्या गंभीर होत आहे. याचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरणासाठी गरज असलेल्या लसी आपल्याला मिळाल्या पाहिजेत. गरज भासल्यास परदेशातून लसी मागवा. मात्र, आपल्या शेतकऱ्यांचे पशूधन वाचले पाहिजे. प्राण्यांच्या लसीकरणासाठी सरकारने योग्य नियोजन करावे, असेही ते म्हणाले. लंपीमुळे दगावलेल्या प्राण्यासाठी सक्तीने कर्जवसूली करू नये, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, अशा मागण्या त्यांनी केल्या.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी पोलीसांनी सहा तासात पकडले सोन्याचे दागिने लंपास करणारे 3 महिला चोर !

0

बार्शी पोलीसांनी सहा तासात पकडले सोन्याचे दागिने लंपास करणारे 3 महिला चोर !

परराज्यातील महिला टोळी जेरबंद, 2.05 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बार्शी – शहरात 07/09/2022 रोजी फिर्यादी नामे प्रियंका अंकुश थाटे वय २७ वर्षे रा. ईडा अंतगांव ता. भुम, , जि. उस्मानाबाद या बार्शी येथून मिरज येथे जाणे करीता औरंगाबाद इचलकरंजी बसमध्ये चढत असताना अज्ञात इसमाने त्यांचेजवळ असलेले सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा एकुण 2,05,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत बार्शी शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने ती बार्शी शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ५९७/२०२२ भादवि. कलम ३७९ प्रमाणे दाखल आहेत. यातील 3 महिला आरोपींना पोलिसांनी अवघ्या 6 तासांत जेरबंद केले आहे.

सदर गुन्हयाचा तपास करीत असताना यातील फिर्यादीचे सोने व पैसे हे तीन महिलानी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्या नंतर त्यांचा तांत्रिक पध्दतीने तपास केला असता सदरच्या महिला ह्या बार्शी सोलापूर बसने सोलापूर कडे गेल्याचे निष्पन्न झाल्याने लागलीच त्यांचा पाठलाग करून त्यांना नान्नज ता. उत्तर सोलापूर येथून ताब्यात घेवून त्यांची महिला पोलीस अंमलदार करवी अंग झडती घेतली असता महिला पद्मीनी अनंत सकट वय-५० वर्षे, रहाणार धक्का तांडा शहाबाद ता.चितापूर जि. गुलबर्गा (कर्नाटक) हिचे अंगझडतीमध्ये १,८०,०००/- रू चे चार तोळयाचे सोन्याचे पट्टीचे गंठण व २२,५००/-रु. चे पाच ग्रॉम वजनाचे कानातील सोन्याचे दागिणे तसेच महिला नुरी रंजित उपाडे वय – ४० वर्षे रा. सदर, हिची अंग झडतीमध्ये चोरीस गेलेली रोख रक्कम २,५००/-रु. असे एकुण 2,05,000/- रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पद्मीनी अनंत सकट, नुरी रंजित उपाडे, नर्मदाबाई नेरू उपादे उर्फ माधुरी जॅकी पाटील वय-३५ वर्षे, रा.धक्का तांडा शहाबाद ता.चितापूर जि.गुलबर्गा राज्य कर्नाटक यांना सदर गुन्हयात अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक सोलापूर हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी विभाग जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, सहाय्यक पोलिस फौजदार अजित वरपे, पोलीस अरूण माळी, सिंधु देशमुख, वैभव ठेंगल, मनिष पवार, संगाप्पा मुळे, रवी लगदिवे, सचिन देशमुख, ज्ञानेश्वर घोंगडे, अर्जुन गोसावी, अविनाश पवार यांनी केली आहे.

दरम्यान, पोलिसांच्या या कामगिरीचे बार्शी शहरामध्ये कौतुक केले जात आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर जिल्ह्यात 11सप्टेंबरपर्यंत मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

0

सोलापूर जिल्ह्यात 11सप्टेंबरपर्यंत मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आवाहन

सोलापूर : प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचेकडून हवामान विषय मिळालेल्या पूर्व सुचनेनुसार सोलापूर जिल्हयात 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत जिल्हयात अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची आणि विजा चमकण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी

विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून विद्युत स्त्रोतांपासून अलग करुन ठेवावीत. दूरध्वनी ,भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब राहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. एखाद्या मोकळया परिसरात असल्यास,गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.

मुसळधार पावसात पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी
मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर जाणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी राहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करू नका. घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची रेल्वेची व रस्ते वाहतूकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करून घ्या. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये. मोबाईवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तुपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.

मुसळधार पावसामुळे उध्दभवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर दूरध्वनी क्रमांक 0217- 2731012 या दूरध्वनीवर संपर्क साधावा. हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imdumumbai.gov.in या संकेतस्थळावरून घ्यावी. कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका व अफवा पसवरू नका. अतिवृष्टी कालावधीत झाडे पडणे. घर किेवा इमारत कोसळणे , पूर येणे ,दरडी कोसळणे अशा आपत्ती घडण्याची शक्यता असते अशावेळी नागरिकांनी सर्तक राहावे. आपत्कालीन स्थिती उदभवण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जसे दरड प्रवण क्षेत्र याठिकाणी आपण राहत असल्यास प्रशासनाकडून मिळणा-या सुचनांचे पालन करावे. पूर प्रवण क्षेत्र व पाणी तुंबण्याची ठिकाणे या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास त्याबाबत जागरुक राहावे व योग्य ती दक्षता घेण्यात यावी.
जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती .पूल इ. ठिकाणी जाऊ नये.

अतिवृष्टी होत असल्यास कोणीही नदी नाले इ. ठिकाणी जाऊ नये. अतिवृष्टी कालावधीत रस्ते निसरडे बनल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी वाहन चालवताना आवश्यक ती काळजी घेण्यात यावी. पूराच्या पाण्याजवळ अथवा नदी पात्रात उभे राहून नागरिकांनी सेल्फी काढू नये. आपत्कालीन परिस्थिती सेल्फी काढून नागरिकांनी स्वत:चा जीव धोक्यात घालू नये.
हवामान विभागाकडून दिलेल्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे करण्यात आले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापुरात बनावट खवा बनवणारा कारखाना ‘सील’ ; आतील चित्र पाहून आला किळस

0

सोलापूर : अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त खवा बनविण्याऱ्या आस्थापनेची गोपनीय माहितीच्या आधारे मु. पो. कंदलगांव, ता. दक्षिण सोलापूर येथील हकमाराम चौधरी यांच्या मालकिच्या चौधरी दुध डेअरी या आस्थापनेवर सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत व अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोणपे यांनी यशस्वीरित्या धाड टाकली. 

सदर ठिकाणी उपस्थित असलेल्या मदनराम पटेल यांच्याकडून कृत्रिमरित्या खवा बनविण्याचे काम सुरु होते. त्यांनतर सदर ठिकाणावरुन श्रीमती अस्मिता टोणपे यांनी खया व इतर भेसळकारी अन्न पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन खवा- १५० किलो, किंमत रुपये – २७०००८,  रिफा. पामोलिन तेल (अपमिश्रक)- १०५ किलो, किंमत रुपये १८९१४, हिमालया कंपनीचे स्किम्ड मिल्क पावडर (अपमिश्रक) १६० किलो, किंमत रुपये- ५७६००, महादेव कंपनीचे स्प्रे ड्राईड स्किम्ड मिल्क पावडर (अपमिश्रक)- ८० किलो, किंमत रुपये- २८८००, साखर (अपमिश्रक)- ३०० किलो, किंमत रुपये – १०५०० व  वनस्पती (अपमिश्रक)- १९५ किलो, किंमत रुपये- २६०००  असे एकूण एकत्रित किंमत रुपये १६८८१४ चा साठा जप्त करण्यात आलेला आहे.

 त्यांनतर सदर पेढीस तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे नोटीस देण्यात आलेली आहे. उपरोक्त नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार पुढील योग्य ती कायदेशिर कारवाई घेण्यात येईल तसेच सर्व मिठाई उत्पादक व विक्रेत्यांनी अशा कृत्रिम खव्यापासुन मिठाई बनवु नये, तसे आढळून आल्यास त्यांचेवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कडक कारवाई घेण्यात येईल असे अवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत यांनी केले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

का केला बार्शीतील ब्रह्मवृंदानी आमदार राऊतांचा वेद मंत्रोच्चारात सत्कार ; वाचा सविस्तर-

0

ब्राम्हण समाजाच्या सभागृहासाठी आमदार निधीतून 20 लाख; का केला बार्शीतील ब्रह्मवृंदानी आमदार राऊतांचा वेद मंत्रोच्चारात सत्कार ; वाचा सविस्तर-

बार्शी: ब्राह्मण समाजाच्या सभागृहासाठी आमदार निधीतुन २० लाख रुपये निधी देण्यात येईल.त्याचप्रमाणे स्व.काकासाहेब सुलाखे यांचे कर्तृत्व व योगदान पाहता त्यांचा गौरव व्हावा म्हणून बार्शी नगर परिषदेच्या माध्यमातून लवकरच एखाद्या इमारतीस त्यांचे नाव देण्यात येईल असे आश्वासन आमदार राजेंद्र राऊत यांनी दिले.

श्री भगवंत मंदीर बार्शी येथे शहरातील ब्रह्मवृंदाशी ( ब्राह्मण समाज ) आमदार राऊत यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

त्यावेळी विजय कुलकर्णी, व्यंकटेश कुलकर्णी, अनंत कवठाळे , प्रविण शिरसीकर, विजय घुमरे या पदाधिकाऱ्यांनी ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्या मांडल्या.


ब्राह्मण समाजाचे जे काही प्रश्न असतील ते माझ्याकडे घेऊन या ते सोडविण्याची संधी मला द्यावी अशी विनंती त्यांनी केली.

यावेळी शिक्षक दिनाचे औचित्य साधुन डॉ. ना.पां. देशपांडे, अनंत कवठाळे, अनिल देशपांडे, तुषार महाजन, प्रसाद सहस्त्रबुद्धे, व्यंकटेश कुलकर्णी, विनायक देशपांडे, मुकुंदराज कुलकर्णी या गुरुजनांचा सत्कार करण्यात आला.

ब्राह्मण समाजाला सभागृहासाठी धर्माधिकारी प्लॉट येथे विनामोबदला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकाश धर्माधिकारी यांचा ही सत्कार करण्यात आला.

मुख्याध्यापक म्हणून भारत पवार यांची पदोन्नती झाल्या बद्दल ही यावेळी सत्कार केला.

त्यानंतर बार्शी पुरोहित संघाचे वतीने वेद घोष व मंत्रोच्चारात आमदार राऊत यांचा सत्कार करण्यात आला.

सदर बैठकीसाठी ब्राम्हण महासंघाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रविण शिरसीकर, प्रदेश सदस्य विजय कुलकर्णी, ॲड. संतोष कुलकर्णी, बार्शी तालुकाध्यक्ष कैलास बडवे, कार्याध्यक्ष दिनकर सापनाईकर, मुकुंद कुलकर्णी, मुकुंदराज कुलकर्णी, शहराध्यक्ष प्रसाद सहस्त्रबुध्दे, सचिव तुषार गदगी, पांडूरंग कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी निरमावाले, अमित आपटे, अमोल सुलाखे, अमोल कुलकर्णी, प्रसाद शिरसीकर, मंदार कुलकर्णी, राजाभाऊ कुलकर्णी, नितीन देशपांडे, पद्माताई काळे, पेशवा युवा मंचचे सुर्यकांत देशमुख, सुशिल बडवे व ब्राह्मण महासंघ, पेशवा युवा मंच, पुरोहीत ब्राह्मण संघ, महीला आघाडी ब्राह्मण महासंघ यांचे सर्व पदाधिकारी व बार्शीतील ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने हजर होता.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ताज्या बातम्या

error: Content is protected !!