गावात जसा सोडलेला वळू असतो तसा राजू शेट्टी हा वळू रेडा आहे – सदाभाऊ खोत
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टीवर जोरदार टीका करत अत्यंत खालच्या पातळीची टीका शेट्टी यांच्यावर केली आहे. “राजू शेट्टी भंपक माणूस आहे. ते भ्रमिष्ठ झालेत. गावात जसा सोडलेला वळू असतो तसा राजू शेट्टी हा वळू रेडा आहे. जसा वळू जिथं तिथं तोंड घालतो, तसं राजू शेट्टी जिथं तिथं तोंड घालत आहे” अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.


राजू शेट्टी यांची मस्ती हातकणंगले मतदारसंघातील लोकांनी उतरवली आहे. राजू शेट्टी हे पाय चाटण्यासाठी बारामतीला गेले, जिथे जाईल तिथं पाठीत खंजीर घुपसायचा असा त्यांचा उद्योग आहे, असा जोरदार हल्ला सदाभाऊ खोत यांनी केला.
राजू शेट्टी यांच्या शाळेचा मी मुख्याध्यापक होतो, त्यामुळे त्यांचे सर्व कारनामे मला माहिती आहेत. यांच्यासारखं ३०० एकर जमीन कुठं घेऊन ठेवल्या नाही, पेट्रोल पंप कार्यकर्त्यांच्या नावावर घेऊन ठेवल्या नाहीत, असा दावा सदाभाऊ खोत यांनी केला.