मंडप डेकोरेशन असोसिएशनच्या तालुका अध्यक्षपदी सचिन सावंत तर सचिवाची जबाबदारी सुनील कोल्हे वर

0
598

मंडप डेकोरेशन असोसिएशनच्या तालुका अध्यक्षपदी सचिन सावंत तर सचिवाची जबाबदारी सुनील कोल्हे वर


बार्शी : बार्शी तालुका मंडप डेकोरेशन अँड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून बार्शी तालुका अध्यक्षपदी सचिन सावंत यांची निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष अनिल गवळी यांनी दिले आहे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मंडप डेकोरेशन व्यवसायिकांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा पातळीवर कार्यान्वित ही संघटना आहे बार्शी शहर आणि तालुक्यातील सर्व सदस्यांच्या बैठकीत सर्वानुमते सावंत यांची तालुकाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली तसेच नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या आहेत.

यामध्ये उपाध्यक्षपदी नागेश सरवदे,राहुल झोबाडे , सागर वाघमारे, शाम बडवे, सचिव पदी सुनील कोल्हे ,सागर गाढवे तर कार्याध्यक्ष पदी सुभाष भोसले, शक्ती पवार, प्रतीक पाठक,नितीन राऊत,रवी पवार,लक्ष्मण ठोगे, विशाल कोटगुंड आणि खजिनदार पदी दिगंबर गरदडे यांची निवड करण्यात आली आहे यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सचिन सावंत म्हणाले की डेकोरेशन व्यवसायातील गुंतवणूक ,कष्ट आणि नुकसान बघितले तर तसा व्यवसाय फार जोखमीचा आहे आणि सध्या कोविड १९ मुळे मंडप डेकोरेशन व्यवसायिक पूर्णपणे अडचणीत आले आहेत अशा वेळी सर्वांना सोबत आणि विश्वासात घेऊन आवश्यक ती परवानगी, व इतर सर्व अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here