सत्ता गेल्यापासून फडणवीसांचे सर्व मुहूर्त चुकतायत- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
सत्ता गेल्यापासून फडणवीसांचे सर्व मुहूर्त चुकत आहे अशी खोचक टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. आत ते दूध आंदोलना संदर्भात प्रसार माध्यमांशी कोल्हापूर येथे बोलत होते. भाजपाने दूध दरवाढीसाठी केलेलं आंदोलन त्यांच्या दृष्टीने योग्यच असेल आणि ते केलेच पाहिजे मात्र त्यांनी आज आंदोलनासाठी काढलेला मुहूर्त चुकीचा आहे.


आज शासकीय सुट्टीच्या दिवशी व बकरी ईद असताना आंदोलन पुकारले आहे, अशा परिस्थिती त्यांच्याकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न मुश्रीफ यांनी उपस्थित केला होता. सत्तेवरुन पायउतार झाल्यापासून देवेंद्र फडणवीस यांना काय झाल आहे हे कळत नाही. त्यांनी काढलेला मुहुर्त नेहमीच चुकीचा ठरत आहे.
चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अभिष्टचिंतन करण्याचे सोडून फडणवीसांनी भाजप कार्यकारिणी बैठक घेत त्यांना अपशकून केला, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. त्यामुळे आता भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.