रियाने दिली होती सुशांतला मेडिकल रिपोर्ट लीक करण्याची धमकी

0
429

रियाने दिली होती सुशांतला मेडिकल रिपोर्ट लीक करण्याची धमकी

सिने अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांने आपल्या मुंबईस्थित घरामध्ये १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्ये नंतर मुंबई पोलिसांकडून अनेकांची चौकशी करण्यात आली होती. मात्र आता सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथे त्याच्या अत्यंत जवळची मैत्रीण असलेली रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच तिच्यावर अनेक प्रकारचे गंभीर आरोप सुद्धा सुशांतच्या वडिलांनी लावले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सुशांतच्या वडिलांनी दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘माझा मुलगा सुशांतला फिल्म लाइन सोडून केरळमध्ये सेंद्रिय शेती करायची होती, त्याचा मित्र महेश त्याच्याबरोबर कुर्गला जाण्यास तयार होता, जेव्हा रियाने सांगितले की, ‘तू कोठेही जाणार नाहीस. आणि जर तू माझे ऐकत नसेल तर मी तुझा मेडिकल रिपोर्ट मीडियात देईन आणि सर्वांना सांगेल की तू वेडा आहेस असे आरोप रिया चक्रवर्ती हिच्यावर लावले आहेत.

जेव्हा रियाने पाहिले की सुशांत तीच ऐकत नाही आणि त्याचा बँक बॅलन्स खूपच कमी झाला आहे, तेव्हा रियाला वाटले की आता सुशांतचा तिचा काही उपयोगाचा नाही. सुशांतसोबत राहणारी रिया ८ जून रोजी घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, पासवर्ड, क्रेडिट कार्ड आणि त्याचा पिन क्रमांक, सुशांतची महत्वाची कागदपत्रे आणि उपचारांची कागदपत्रे घेऊन सुशांतच्या घरुन निघून गेली होती.

तर केके सिंह यांनी तक्रारीत असे म्हटले आहे की, तिने सुशांतचा फोन नंबर ब्लॉक केला होता. यानंतर सुशांतने माझ्या मुलीला फोन केला होता आणि म्हणाला होता की, रिया मला कुठेतरी अडकवेल, ती इथून बऱ्याच वस्तू घेऊन गेली आहे आणि मला धमकी दिली आहे की, जर तू माझे ऐकले नाही तर तुझे मेडिकल रिपोर्ट मीडियामध्ये लीक करेल आणि सांगेल की तू वेडा आहेस. तुला कोणी काम देणार नाही आणि तू बर्बाद होऊन जाशील.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here