ग्लोबल न्यूज- देशात गेल्या 24 तासांत आतापर्यंतची सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत 28,701 नवे रुग्ण सापडले असून 500 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत भारतातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 8,78,254 वर पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 3,01,609 कोरोनाबाधित रुग्ण असून 5,53,471 जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत 23,174 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोना बाधितांमध्ये काल 7,827 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णसंख्या 2,54,000 झाली आहे. अवघ्या सहा दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजाराने वाढली.
गेल्या 24 तासांत राज्यात 173 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ही 10,289 झाली. दिल्ली 1,12,494, तमिळनाडूत 1,38,470 रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.
देशात आजवर 1,18,06,256 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत पैकी 2,19,103 चाचण्या या रविवारी (दि.12) करण्यात आल्या आहेत.