वैराग : कत्तलीसाठी गोवंशाची जनावरे घेऊन जात असल्याची बातमी मिळाल्यावरुन गोरक्षकांनी तीन वाहने पकडून त्यातील गायी पोलीसांच्या मदतीने सोलापूर येथील गोशाळेमध्ये जमा केल्या.
जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी, सोलापूरचे अशासकीय सदस्य, सुधाकर महादेव बहीरवाडे (वय ४१) रा. भवानी पेठ, सोलापूर व त्यांचे गोरक्षक मित्र प्रविण शंकर सरवदे, प्रसाद शिवाजी झेंडगे, अविनाश कय्यावाले, मोहन राजू शिंदे, दिनेश दणके, अनिल पवार, पवन कोमटी आणि रोहित बागल यांनी दि. ३ मार्च २०२२ रोजी रात्री साडेअकराचे सुमारास रुई ते मालेगांव जाणा-या रस्त्यावर बार्शी तालुक्यातील रुई गांवाजवळ, दोन पिकअप व एक अशोक लेलँड वाहने पोलीसांच्या मदतीने पकडून, त्यामधून एकूण तेरा जर्सी गायींची सुटका केली.
वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जनावरे दाटीवाटीने कोंबून, हालचाल करता येणार नाही, वेदना होईल अशा पध्दतीने, अरुंद जागेत तसेच वाहनांत जनावरांच्या चारापाण्याची व औषधाची कोणतीही सुविधा नसताना, प्रत्येक जनावरांचे चारही पाय व मान नायलॉनच्या दोरीने पिकअपच्या साईडच्या लोखंडी पाईपला आमानुषपणे व निर्दयीपणे बांधून कोंबून भरलेले होते.
पोलिसांनी नऊ लाख तीस हजार किंमतीची तीन वाहने जप्त केली. सदरच्या गायी कत्तलीसाठी घेवून जाण्यात येत होत्या, अशी तक्रार सुधाकर बहीरवाडे यांनी वैराग पोलिसांत दिल्यावरुन, शकिल वाहब कुरेशी (वय २६) रा. पापनस, ता. माढा, आवेज दादा कुरेशी (वय १९) रा. बुधवार पेठ, मोहोळ, आणि सैफअली आरिफ कुरेशी (वय २२) रा. आझाद चौक, अकलूज यांच्याविरुध्द प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५, प्राण्यांचे परिवहन नियम १९७८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
