कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा ‘या’ जिल्ह्यात ‘रेड अलर्ट
ग्लोबल न्यूज : राज्यात मॉन्सून सक्रीय झाल्याने पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह कोकण, विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा करण्यात आला आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सुरतगडपासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. यातच पश्चिम किनारपट्टीवर हवेच्या खालच्या थरात जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कोकणात पावसाने जोर धरला आहे. विदर्भातही मुसळधार पाऊस पडत आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’, तर रायगड, रत्नागिरी, ठाणे, पुणे आणि सातारा जिल्ह्यात ‘ रेड अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे. पालघर, सिंदुधुर्गातही अनेक ठिकाणी पावसाचा इशारा आहे. उर्वरीत मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. तर विदर्भात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.