सोलापूर :सोलापूर महापालिका हद्दीत आज नव्या 42 रुग्णांची भर पडली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. एमआयडीसी परिसरातील अनिता नगरातील 55 वर्षीय पुरुष तर विजयपूर रोडवरील सैफूल परिसरातील 70 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने बळी घेतला आहे. मागील काही दिवसांत शहरात सरासरी शंभरपेक्षा अधिक रुग्ण सापडत होते. मात्र, आता 50 ते 55 च्या सरासरीने रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ही बाब दिलासादायक आहे.

राघवेंद्र नगर (विडी घरकूल), रविंद्र नगर (आकाशवाणी केंद्राजवळ), प्रताप नगर (विजयपूर रोड), विजया हौसिंग सोसायटी (कुमठे), स्वामी विवेकानंद नगर, थोबडे वस्ती (देगाव नाका), मल्लिकार्जुन नगर (उत्तर कसबा), बुधवार पेठ, सिव्हिल क्वार्टर, सिध्देश्वर हौसिंग सोसायटी (भवानी पेठ), वसंत विहार फेज-दोन, न्यू पाच्छा पेठ, लोणार गल्ली,

दक्षिण कसबा, दुरवांकुर बॅंक कॉलनी (इंदिरानगर), दाजी पेठ, हरिपदम रेसिडेन्सी, संजीता अपार्टमेंट, हरेकृष्ण विझर, गुलमोहर अपार्टमेंट, काडादी चाळ, तृप्ती कॉर्नरजवळ (मोदी), सुरवसे नगर (कुमठा नाका), आदित्य नगर (आरटीओजवळ), चेतक सोसायटी (मुरारजी पेठ), साठे-पाटील वस्ती, लक्ष्मी विष्णू चाळ, शास्त्री नगर आणि मुरारजी पेठ या परिसरात आज नवे रुग्ण सापडले आहेत.